17 May 2024 11:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा
x

राजकारणापलीकडे नाते टिकून ठेवणाऱ्या राज ठाकरेंना राऊतांनी अशा दिल्या शुभेच्छा

MP Sanjay Raut, Raj Thackeray

मुंबई, १४ जून: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊतांनी ट्विट करून राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले..असे म्हणत संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे.

वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले.. असे व्यंगचित्रकार..रसिक मनाचे राजकारणी श्री. राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. जय महाराष्ट्र… असं ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. राजकीय व्यक्तींमध्ये विचारांनी मतमतांतर असू शकते. पण अनेकदा ही मंडळी मित्रत्वाचे नाते ठेवतात हे देखील समोर आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

व्यंगचित्र, राजकारणाबरोबर राज ठाकरेंना चित्रपट आणि फोटोग्राफी या क्षेत्राचीही विशेष आवड आहे. राज यांना चित्रपट पाहायला आवडतात. मराठी चित्रपट सृष्टीबरोबर बॉलिवूडमध्येही त्यांचे उत्तम संबंध आहे. राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हे सख्खे भाऊ. संगीत क्षेत्राची आवड असलेल्या श्रीकांत ठाकरे संगीतकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. मार्मिकच्या उभारणीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.

लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध होणाऱ्या राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचा भाजपानेही धसका घेतला होता. म्हणूनच पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर रेखाटलेल्या प्रत्येक व्यंगचित्राला भाजपा समर्थकही व्यंगचित्रातून उत्तर देत होते.

 

News English Summary: Shiv Sena MP Sanjay Raut has wished Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray a happy birthday. Sanjay Raut tweeted congratulations to Raj Thackeray. Sanjay Raut tweeted that the friendship lasted even during the storm.

News English Title: Shiv Sena MP Sanjay Raut has wished Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray a happy birthday News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x