19 May 2024 11:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

महाराष्ट्राचा नकाशा उलटा करून दाखवला, याला म्हणतात महाराष्ट्रद्रोह - भाजपची टीका

BJP Maharashtra, CMO For Mirror Image Map Of Maharashtra, Magnetic Maharashtra

मुंबई, १६ जून : एकीकडे कोरोनाशी लढत असताना महाराष्ट्राने उद्योग उभारणीत दमदार पाऊल टाकून, तब्बल १६ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार सोमवारी केले. उद्योग स्थापण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

उद्योग विभागातर्फे मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० (भाग दोन) चा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी विविध देशांचे वाणिज्यदूत, गुंतवणूकदार ऑनलाइन उपस्थित होते.अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी विविध १२ देशांतील गुंतवणुकदारांशी १६ हजार ३० कोटींचे सामंजस्य करार यात झाले. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. वर्ल्ड असोसिएशन आॅफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीज आणि यूएस इंडिया पार्टनरशिप फोरम सह द्विपक्षीय भागीदारी करारावर स्वाक्षºया करण्यात आल्या.

दरम्यान, या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलेल्या एका फोटोवरुन महाराष्ट्र भाजपाने राज्य सरकारवर टीका केली आहे. सीएमओच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मागील बाजूला असलेल्या बॅनरवर महाराष्ट्राचा नकाशा उलटा (मीरर इमेज) दिसत असल्यावर भाजपाने, “याला म्हणतात महाराष्ट्रद्रोह” असा टोला लगावला आहे.

या फोटोमध्ये लावण्यात आलेला महाराष्ट्राचा नकाशा असणारा बॅनर उलटा ठेवण्यात आला आहे. यावरुनच भाजापने ट्विटवरुन नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांसहीत राज्य सरकारला टोला लगावला आहे. “महाराष्ट्राचा नकाशा उलटा “करून दाखवला.” याला म्हणतात महाराष्ट्रद्रोह! सगळं काही चौपट करून ठेवलं आहे आता नकाशा सुद्धा उलटा केला..” असं ट्विट महाराष्ट्र भाजपाने केलं आहे.

 

News English Summary: The banner with the map of Maharashtra in the photo has been inverted. The BJP has expressed its displeasure over the tweet and has lashed out at the state government, including the Chief Minister. “Inverted map of Maharashtra”. This is called treason in Maharashtra.

News English Title: BJP Maharashtra Criticize CMO For Mirror Image Map Of Maharashtra In Magnetic Maharashtra Video Conference News Latest Updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x