17 January 2020 6:52 PM
अँप डाउनलोड

बदलत्या राजकारणाचं आधुनिक तंत्र सेनेने स्वीकारलं; पण राज ठाकरे ते स्वीकारतील का? सविस्तर

Shivsena, MNS, Raj Thackeray, Udhav Thackeray, Prashant Kishor

मुंबई : सध्या देशातील राजकीय तंत्र झपाट्याने बदलण्यास सुरुवात आली आहे. अगदी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत हे तंत्र भाजपने यशस्वीपणे राबवलं आणि ऐतिहासिक विजय प्राप्त केला होता. कालांतराने राजकारणातील ते गणित समजून घेण्याचा आणि यशस्वी होण्याचं तंत्र देशातील इतर प्रमुख पक्षांनी देखील समजून घेऊन अमलात आणण्याचा प्रयत्न केला. आजच्या घडीला ज्या पक्षांनी निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच ३-४ महिने चिकाटीने आणि योजनाबद्धपणे राबवलं तेच देश व राज्यात निवडून आले किंवा मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले. राजकारणातील हे औटसोर्सिंगच हे तंत्र जो पक्ष अमलात आणेल तोच भविष्यात स्वतःचं अस्तित्व टिकवेल अशीच परिस्थिती आहे.

Loading...

अगदीच भाजप व्यतिरिक्त उदाहरणं द्यायची झाल्यास आंध्र प्रदेशातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालात टीडीपी भुईसपाट होणे आणि वायएसआर’ने मुसंडी मारणे हा देखील त्याच ‘पीके’ म्हणजे प्रशांत किशोर यांच्या ‘आयपॅक’चा परिणाम होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रशांत किशोर यांची मातोश्री भेट देखील त्याच तंत्राचा स्वीकार करणे असा होता. परिणामी शिवसेना देखील लोकसभा निवडणुकीत मोठी कामगिरी करून गेला आणि भाजप बहुमताने जरी निवडून आला असला तरी सेनेने स्वतःच अस्तित्व कायम ठेवलं आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सतर्क होत, लगेचच प्रशांत किशोर यांची भेट घेतली आहे.

काँग्रेसने देखील २०१४च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी याच प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क साधत आधीच पावलं उचलण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला काही गोष्टी सुचवल्या होत्या आणि त्यात प्रियांका गांधी यांना मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून जाहीर करा असा सल्ला दिला होता. मात्र काँग्रेसमधील अति अनुभवी नेत्यांनी प्रशांत किशोर यांना बोलावून घेतलं आणि तुम्ही केवळ तुमचे व्यावसायिक सल्ले द्या आणि आमच्या पक्षात ढवळाढवळ करू नका अशी तंबी दिली आणि तिथेच प्रशांत किशोर यांनी काँग्रेसपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी त्यावेळेची दिलेला सल्ला किती महत्वाचा होता याचा प्रत्यय काँग्रेसला आला असावा.

दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने रडगाण्याशिवाय कोणतंही काम ५ वर्ष केलं नसताना देखील पुन्हा यश संपादन केलं आहे. कारण निवडणूक लढविण्याचे तंत्र शिवसेनेने स्वीकारले आणि अमलात देखील आणले. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात या वेळी ‘पीके’ टीमने मोठे काम केले. शिवसैनिकांना ‘पीके’ कोण असे विचारले की ‘प्रशांत किशोर’ असे ते सांगतात. प्रत्येक मतदारसंघात या ‘टीम’चे १०० जण काम करीत होते. उमेदवाराने कोणत्या गावात सभा घ्यायची, कोणत्या विषयावर बोलायचे, काय बोलले म्हणजे लाभ होईल, याची गणिते मांडली जात होती. एका उमेदवाराने साधारणत: ७० ते ८० सभा घेतल्या. त्या सर्व सभा ‘फेसबुक’वर लाईव्ह दाखविल्या जायच्या. समाजमाध्यमांवर उत्तरे देणारी एक टीम काम करत होती. पूर्वीची शिवसेना बदलत असल्याचे चित्र या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाडय़ात दिसून आले. केवळ एका औरंगाबादच्या जागेवर फटका बसला त्याची कारण वेगळीच होती.

लोकसभेत शिवसेनेच्या पदरात मतदारांनी भरभरुन टाकले. हिंगोली, परभणी, उस्मानाबाद या ३ लोकसभा मतदारसंघात हेमंत पाटील, संजय जाधव आणि ओम राजेनिंबाळकर निवडून आले. त्याला ‘पीके’ टीमची साथ होती, असे सांगण्यात येत आहे. उमेदवार जाहीर होण्यापूर्वीपासून परराज्यातून आलेली ही मंडळी प्रत्येक गावातील प्रश्न, त्यावर काय भाष्य केले म्हणजे शिवसेनेच्या बाजूने मतदान झुकेल, याची माहिती देत होते. कोणाशी बोलल्यानंतर काय होईल, याचाही तपशील पुरवला जायचा. त्यामुळे या वेळी शिवसेनेचे उमेदवार ‘पीके’टीमच्या सूचनांवर चालायचे.

समाजमाध्यमांवरील सेना उमेदवारांचा वापरही अधिक होता. उस्मानाबादच्या उमेदवाराने तर विरोधकांचे कार्टुन काढण्यासाठी पुण्यात एका व्यक्तीला खास नियुक्त केले होते. निवडणूक प्रचार यंत्रणा बदलण्याचा लाभ काही मतदारसंघात शिवसेनेला झाला. त्यास भाजपच्या पन्ना प्रमुख यंत्रणेचीही मोठी मदत झाल्याचे निवडून आलेले खासदार सांगतात. तुलनेने हे सारे घडत असताना शिवसेनेच्या नेत्यांनी तरुण मुलांसाठी आदित्य ठाकरे यांचे लाँचिंग केले. खास महाविद्यालयीन तरुणांसमोर रॉक बॅण्ड लावून ‘फॅशन शो’साठी जसे रॅम्प वापरले जातात तसे व्यासपीठ उभे करण्यात आले होते. त्यांनी संवाद साधला. पण त्या दिवशी लोकसभेतील उमेदवारास मात्र बोलविण्यात आले नव्हते. हा उपक्रमही ‘पीके’टीमकडूनच घेण्यात आला होता. त्यामुळे एखादा ‘इव्हेंट’ किती नीटनेटका असावा याचे ते उदाहरण होते. कार्यकर्त्यांचे निवडणुकीच्या काळातील हे ‘आऊटसोर्सिग’ सेनेमध्ये घडलेला मोठा बदल होता.

दरम्यान प्रशांत किशोर यांची ‘आयपॅक’ ही काही देशातील एकमेव निवडणुकांचे रणनीतीकार असलेली कंपनी नाही. कारण २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत स्वतः भाजपसाठी त्यांनी काम केलं नाही, मात्र २०१४ मध्येच भाजपने ते अनुभवातून अवगत करून घेतलं आणि २०१९ पर्यंत पुन्हा राबवलं आणि पुन्हा सत्तेत विराजमान झाले. महाराष्ट्रनामा न्यूजच्या टीमने देखील निवडणुकांचे रणनीतीकार अभिजित भुरके यांच्याशी पुण्यात संपर्क साधून अनेक गोष्टी समजून घेतल्या होत्या. विशेष म्हणजे अभिजित भुरके हे सध्या महाराष्ट्र सैनिक आहेत आणि गुढीपाडव्याच्या सभेत त्यांनी मनसेत प्रवेश केला होता. उच्च शिक्षित असलेले अभिजित भुरके यांनी यापूर्वी अनेक खासदार आणि आमदारांसाठी निवडणुकांचे रणनीतीकार म्हणून काम केलं आहे आणि विशेष म्हणजे त्यांचा निकाल १००% होकारात्मक राहिला आहे. त्यात राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ जेथे नवोदित उमेदवार देखील जाईंट किलर ठरला आहे आणि त्या निवडणुकीची रणनीती देखील अभिजित भुरके यांनी आखली होती, मात्र काही कारणास्तव सदर उमेदवाराचे नाव न छापण्याची त्यांनी अट घातल्याने ते नाव येथे देण्यात आले नाही.

आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी देखील याच रणनीतीचा वापर प्रभावी करणे आणि तत्पूर्वी तो स्वतः समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर अभिजित भुरके यांच्यासारखी उच्च शिक्षित आणि निवडणुकांच्या रणनीतीचा अनुभव तसेच अभ्यास असणारी लोकं मनसेतच असतील तर राज ठाकरे यांनी वेळीच सदर विषयात प्रत्यक्ष लक्ष घालून ‘कमर्शियली’ का होईना, स्वतःकडे उपलब्ध असलेल्या या संपत्तीचा आणि गुणवंतांचा पक्षासाठी वापर करून घेणं गरजेचं आहे, अन्यथा व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार करून संबधित गुणवंत लोकं इतरांच्या हाती लागल्यास त्याचा दोष त्यांना देखील देण्यात काहीच अर्थ नसेल. त्यामुळे देशभरातील इतर पक्षांनी जर ‘पीके’ म्हणजे प्रशांत किशोर यांच्या अनुभवावर विश्वास टाकला असेल तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अनुभवी ‘एबी’ म्हणजे अभिजित भुरके यांच्यावर विश्वास दाखवणे ही काळाची गरज आहे, कारण नव्या राजकीय तंत्राचा वापर करणं ही मनसेसाठी काळाची गरज आहे.

महत्वाची सूचना: आपण सरकारी नोकरीचा सराव महाराष्ट्रनामा न्यूज'वर ऑनलाईन करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि सुरु करा सरकारी नोकरीचा ऑनलाईन अभ्यास ऑनलाईन

https://www.maharashtranama.com/online-test/

NOTE: mahapariksha, mahaportal, maha portal, mahapolice, govnokri, govnokri, govnokari, mpscworld, mpsc world, majhi naukri, majhinaukri, mazi nokari, majhi nukari, mahampsc, mahaonline, mahanmk, mahadbt, mahadbt login, mahadbtmahait, mahadbtmahait, mahanews, maha news, nokari sandharbha, majhanews, Current Recruitment 2020, Latest Government Jobs, Latest Government Jobs In Maharashtra 2020, Government Recruitment, Jobs in Government Sectors, Bank Jobs, Online Application Form, Defence Job, Engineering Jobs, freshersworld, freshers world, maharashtra police, Police Bharti, drdo recruitment, ibps, government jobs, lic recruitment, fresherslive, driving licence test, general knowledge, rto exam, mscit, ms cit, mscit course, ms cit course, driving licence test, learning license test, driving license test, learning licence test, parivahan, rto exam in english, learning licence test questions, NIOS Bridge Course for B.Ed Teacher, Talathi Bharti

हॅशटॅग्स

#Prashant Kishore(4)#Raj Thackeary(512)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या