21 October 2019 4:11 PM
अँप डाउनलोड

आज उद्धव ठाकरे यांचा नाशिक व औरंगाबाद दौरा; शेतकऱ्यांशी संवाद साधणार

Shivsena, Udhav Thackeray

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष कामाला लागलेले असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील जोरदार तयारीला लागले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरे हे पीक विमा केंद्रांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यात अजूनपर्यंत मान्सूनचं आगमन न झाल्याने परिस्थिती अजूनच बिकट झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट उभं राहिलं आहे. या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा दौरा असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.

नाशिकमध्ये शिवसेनेने सुरु केलेल्या नांदगाव येथील पीक विमा केंद्राला भेट देऊन तेथील शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे थेट संवाद साधणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत, स्थानिक शिवसेना नेते, आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. नाशिकच्या आधी ते औरंगाबाद येथील लासूर स्टेशनजवळ उभारण्यात आलेल्या पीक विमा केंद्राची पाहणी करुन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

मागील काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंनी जालना येथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रावर कोसळलेले दुष्काळाचे संकट अत्यंत गंभीरच आहे. परंतु त्यावरून राजकीय पोळ्या भाजणे योग्य नाही. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकार काहीच करीत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(633)#udhav Thakarey(392)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या