29 April 2024 9:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

फेरपडताळणी: कोविड मृत्यूंची संख्या १३२८ ने वाढली, फडणवीस सरकारवर बरसले

Maharashtra, Covid 19, Corona Virus, Patients count

मुंबई, १६ जून : कोरोनामुळे राज्यात नेमके किती मृत्यू झाले आहेत याची संख्या दडवण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला होता. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिलं होतं. त्यानंतर २४ तासांच्या आत ठाकरे सरकारने फेरपडताळणी करत COVID-19 च्या मृत्यूंची वस्तुस्थिती सांगणारे आकडे जाहीर केले आहेत.

या फेरपडताळणीत कोविड मृत्यूंची संख्या १३२८ ने वाढल्याचं दिसतं. ८६२ प्रकरणं मुंबई महानगर क्षेत्रातली आणि अन्य जिल्ह्यातले ४६६ प्रकरणं कोव्हिड मृत्यू म्हणून नोंदवण्यात आले आहेत. याची सविस्तर यादी राज्य सरकारने आता जाहीर केली आहे. या विषयावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “माझी राज्य सरकारला विनंती आहे की, या प्रक्रियेला आकड्यांच्या फेरपडताळणीचे गोंडस नाव न देता, गेले ३ महिने ही आकडेवारी लपविणार्‍यांवर काय कारवाई करणार, हे सांगितलं गेलं पाहिजे.”

माझी राज्य सरकारला विनंती आहे की या प्रक्रियेला आकड्यांच्या फेरपडताळणीचे गोंडस नाव न देता गेले तीन महिने ही आकडेवारी लपवणाऱ्यांवर काय कारवाई करणार हे सांगितले गेले पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून गेल्या तीन महिन्यांपासून काही कोरोनामृत्यू होऊन सुद्धा ते प्रत्यक्ष आकडेवारीत दाखविले जात नसल्याबद्दल तक्रार केली होती. आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने कारोना बळी कसे नोंदवायचे, याचे स्पष्ट दिशानिर्देश दिले असल्याने ही कार्यकक्षा डेथ ऑडिट कमिटीची कशी काय होऊ शकते? ही समिती मृत्यूसंख्या कमी करण्यासाठी आहे की, मृत्यूसंख्या दडपण्यासाठी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. अखेर आज राज्य सरकारने हे 1328 मृत्यू अधिकचे असल्याचे मान्य केले आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब झाले.

 

News English Summary: According to the re-examination, the number of Covid deaths has increased by 1328. 862 cases in Mumbai metropolitan area and 466 cases in other districts have been reported as covid deaths. The detailed list has now been released by the state government.

News English Title: According to the re-examination the number of Covid deaths has increased by 1328 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x