19 May 2024 7:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा; नाराजीचा विषयच नाही - बाळासाहेब थोरात

Positive discussion, CM Uddhav Thackeray, Minister Balasaheb Thorat

मुंबई, १८ जून : गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारमध्ये सत्तेत असलेल्या महाविकासआघाडीमध्ये सुंदोपसुंदी सुरू असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. त्यात काँग्रेसच्या नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यांमुळे भर पडत होती. मात्र, आता या सगळ्या वादावर खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पडदा टाकला असून ‘काँग्रेसच्या नाराजीचा इथे विषयच नाही. पण काही विषय असतात की ज्यावर नियमित बैठकांमध्ये चर्चा करता येत नाहीत. त्यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. मला खात्री आहे की त्यातून ते निश्चित मार्ग काढतील. आम्ही त्यावर समाधानी आहोत’, असं स्पष्टीकरण दिलं आहे.

‘राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमची कोणतीही नाराजी नव्हती. महाविकासआघाडी भक्कम आहे आणि ५ वर्ष चांगलं काम करेल,’ असं बाळासाहेब थोरात या बैठकीनंतर म्हणाले.

‘आमच्या बऱ्याचशा मागण्या प्रशासकीय स्वरूपाच्या होत्या. सध्याच्या कोरोनाच्या संकटात गरीब माणूस अडचणीत आला आहे. त्याला कशी मदत करता येईल, यावर प्रामुख्याने चर्चा झाली. त्याला व्यक्तिगत स्वरूप नव्हतं. आघाडीचं काम जास्त चांगलं व्हावं, यासाठी आम्ही हे सगळं करत होतो’, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली आहे.

‘नाराजीचा विषय नव्हता. काही विषयांची समोरासमोर चर्चा व्हावी लागते. मोठ्या बैठकांमध्ये ही चर्चा होऊ शकत नाही. आज सकारात्मक चर्चा झाली. चर्चेचे विषय प्रशासकीय होते. विभागाच्या चर्चा होत्या. कोरोनाच्या संकटात गरीब माणूस अडचणीत आला आहे, त्याला कशी मदत करता येईल, याबाबत चर्चा होती. कोणताही वैयक्तिक मुद्दा नव्हता,’ अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली.

 

News English Summary: State Revenue Minister Balasaheb Thorat has unveiled the issue and said, “Congress is not angry here. But there are some issues that cannot be discussed in regular meetings. In this regard, a positive discussion has taken place with the Chief Minister today.

News English Title: Positive discussion has taken place with the Chief Minister Uddhav Thackeray said State Revenue Minister Balasaheb Thorat News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x