30 April 2024 3:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

पतंजली अडचणीत! कफ व तापाचं औषध म्हणून परवाना घेत, कोरोनावर औषध म्हणून लाँच

Uttarakhand government, notice to Patanjali, Coronil Medicine, Covid 19

देहरादून, २४ जून : जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरसविरोधातील औषध आणि लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात पतंजलीने कोरोनाव्हायरसविरोधात औषध शोधून काढलं आहे. बाबा रामदेव यांनी कोरोनिल हे औषध आज लाँच केलं. यामुळे कोरोना रुग्ण सात दिवसांत बरा होत असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला. आता केंद्र सरकारने पतंजलीला काल झटका दिला आहे. कोरोनिलची जाहिरात थांबवावी, आधी सविस्तर माहिती केंद्र सरकारला द्यावी असे निर्देश पतंजलीला देण्यात आले आहेत.

दरम्यान, पतंजली आयुर्वेद लिमिटेडने करोना व्हायरसवर बनवलेल्या औषधाचे सर्व रिपोर्ट तपासल्यानंतरच सरकारकडून मंजुरी देण्यात येईल असे आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी बुधवारी स्पष्ट केले. ‘आयुष’ मंत्रालयाने पतंजलीकडे या औषधातील घटकांचा तपशील मागितला आहे.

दुसरीकडे कोरोनावरील औषध ‘कोरोनिल’ बनवल्याचा दावा करणाऱ्या पंतजलीच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. राजस्थान सरकारने योग गुरु बाबा रामदेवविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. तर आता उत्तराखंड सरकारनेही पतंजलीला नोटीस पाठवण्याची तयारी केली आहे. उत्तराखंड आयुर्वेद विभागाने नोटीस जारी करत पतंजलीलाला औषध लॉन्च करण्याची परवानगी कोणी दिली, असा सवाल उपस्थित केला आहे.

“पतंजलीच्या आवेदनावर आम्ही परवाना जारी केला. या आवेदनात कुठेही कोरोना विषाणूचा उल्लेख नव्हता. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, कफ आणि तापाचं औषध बनवण्यासाठी परवाना घेत असल्याचं म्हटलं आहे”, अशी माहिती उत्तराखंड आयुर्वेद विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी पतंजलीला नोटीस पाठवण्यात आल्याचंही अधिकाऱ्याने सांगितलं.

 

News English Summary: Pantajali, who claims to have made the drug ‘coronil’, is on the rise. The Rajasthan government has hinted that it will file a complaint against yoga guru Baba Ramdev. So now the Uttarakhand government is also preparing to send a notice to Patanjali.

News English Title: Uttarakhand government is also preparing to send a notice to Patanjali over Coronil Medicine News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RamdevBaba(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x