6 May 2024 10:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार
x

पेट्रोल डिझेल दर वाढीविरोधात काँग्रेस सोमवारी जोरदार आंदोलन छेडणार

Congress Will Protest, Petrol Diesel Price Hike

मुंबई, २६ जून : आज काँग्रेसच्या वतीने राज्यभरात लडाखच्या गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल सुनील बाबू यांच्यासहित 20 जवानांना आदरांजली वाहण्यासाठी “शहीदों को सलाम” दिवस आयोजित करण्यात आला होता. त्याचवेळी झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारने सतत 19 दिवस चालू ठेवलेल्या डिझेल, पेट्रोल यांच्या दरवाढीचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच येत्या सोमवारी 29 जूनला काँग्रेस पक्ष संपूर्ण महाराष्ट्रभर पेट्रोल- डिझेल दरवाढीविरोधात आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्याविरोधात आंदोलन करणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले.

बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, “काँग्रेस २९ तारखेला पेट्रोल आणि डिझेलची जी भाववाढ चालली आहे त्याविरोधात एक तासाचं आंदोलन करणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे. यासोबत केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात येणार आहे. इंधनाचे दर वाढत असल्याने अर्थ्यवस्थेला मोठा धक्का बसत आहे”.

काँग्रेसच्या यूपीएच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले होते. तरीही केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे भाव आता आहेत तेवढे कधीच वाढविले नव्हते. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाचे भाव कवडीमोल झाले आहेत. तरीही भाजपाचे केंद्रातील मोदी सरकार आपल्या अंदाजपत्रकातील तोटा भरून काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर अव्वाच्यासव्वा एक्साईज कर लादून गरिबांच्या खिशातून पैसा काढून घेत आहे. एकीकडे कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे ठप्प झालेल्या उद्योगधंद्यांमुळे लोकांचे रोजगार बुडाले आहेत. लोकांकडे कमाईचे कुठचेही साधन नाही. अशावेळी मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या भावामध्ये भरमसाठ दरवाढ करून देशभरात महागाईचा आगडोंब उसळविलेला आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव वाढले आहेत. डिझेलचे भाव कधी नव्हते ते 80 रुपयांच्यावर गेले आहेत.

 

News English Summary: According to the information given by Balasaheb Thorat, “Congress is going to hold an hour-long agitation on the 29th against the increase in petrol and diesel prices. The agitation will be held in front of the Collector office.

News English Title: Congress Will Protest Against Central Government Over Petrol Diesel Price Hike News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x