3 May 2025 11:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

न घाबरता बाहेर पडा, कोरोनाबाबत अधिक शिक्षित व्हा - आरोग्यमंत्री राजेश टोपे

Corona Virus, Covid 19, Health Minister Rajesh Tope

मुंबई, २७ जून : कोरोनाचे संकट जरी असले तरी कोणीही घाबरुन जाऊ नये. नेहमी घबरदारी घेतली पाहिजे. आता आपल्याला कोरोनासोबत जवीनशैलीत बदल करायला हवा. कोरोनाला घाबरुन नका तर कोरोनाला समजून घ्या. कोरोनाबाबत अधिक शिक्षित झाले पाहिजे, असे सांगत कोरोना मृत्यूदर रोखणे मुख्य लक्ष्य आहे, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. टोपे हे ‘झी २४ तास’च्या ‘ ई-संवाद – महाराष्ट्र एक पाऊल पुढे’ याखास कार्यक्रमात बोलत होते.

घाबरु नका, मात्र, जागरुक राहिले पाहिजे असे सांगत घराबाहेर पडताना त्रिसूत्र वापरण्याची गरज आहे. त्रिसूत्र म्हणजे एसएमएस. ही SMS प्रणाली वापरणे गरजेचे आहे. स्व-अंतर (Self distance), मास्क (Mask), सॅनिटायझर (Sanitizer) याची गरज यापुढे निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोनाला घाबरु नका, समजून घ्या. कोरोनाबाबत अधिक शिक्षित व्हा. जीवनशैली बदलायला हवी. कोरोनासोबत जगायला शिकायला हवे, असे सांगत राजेश टोपे यांनी कोरोनानंतर महाराष्ट्र कसा असेल, यावर बोलताना त्यांनी आपली भूमिक स्पष्ट केली.

दरम्यान, देशामध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 18,552 रुग्ण सापडल्याने देशभरातील आकडेवारीने तब्बल 5 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ पाहायला मिळालेली असताना 384 मृत्यूही नोंदविले गेले आहेत. देशात सध्या 1,97,387 रुग्ण उपचार घेत आहेत एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 5,08,953 वर गेला आहे. तर 295881 रुग्ण बरे झाले आहेत. देशात एकूण मृतांचा आकडा 15,685 झाला आहे. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 58 टक्के झाले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शनिवारी (27 जून) याबाबतची माहिती दिली आहे. तसेच जवळपास तीन लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा तीन टक्के आहे. तर दुसरीकडे रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण म्हणजेच डबलिंग रेट हा 19 दिवसांवर पोहचला आहे. लॉकडाऊनच्या आधी हे प्रमाण 3 दिवसांवर होते अशीही माहिती हर्षवर्धन यांनी दिली.

 

News English Summary: No one should be intimidated by the Corona crisis. Always be careful. Now we need to make lifestyle changes with Corona. Don’t be afraid of Corona, but understand Corona. Corona should be more educated said Health Minister Rajesh Tope.

News English Title: Get out of the house without fear be more educated about corona virus said State Health Minister Rajesh Tope News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajeshTope(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या