27 May 2022 6:11 AM
अँप डाउनलोड

देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह | ट्विट करून अधिकृत माहिती

Opposition leader Devendra Fadnavis, Corona positive

मुंबई, २४ ऑक्टोबर : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि बिहार विधानसभा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना करोना झाल्याचं निदान झालं आहे. फडणवीस यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून फडणवीस हे महाराष्ट्र व बिहार असा दोन्ही ठिकाणी फिरतीवर होते. बिहारमध्ये प्रचारामुळे ते सातत्यानं दौऱ्यावर होते. तर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्यानं त्यांनी पाहणी केली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करुन सांगितले की लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, असा संकेत दिसतो. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, असा संकेत दिसतो. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.

 

News English Summary: Devendra Fadnavis tweeted that he has been working every day since the lockdown started. But now there is a sign that we should rest for a while. My covid test came back positive and I isolated myself. He is taking medication as per the doctor’s advice.

News English Title: Opposition leader Devendra Fadnavis positive for coronavirus News Updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(688)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x