2 May 2024 10:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या
x

५९ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू, घोषणेप्रमाणे एकालाही भरपाई नाही, ठाकरे सरकारविरोधात संताप

police personnel, Positive COVID19

मुंबई, ३ एप्रिल: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होतं आहे. त्यात मुंबईतील मोठी लोकसंख्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या शहरांसहित ठाणे, कल्याण डोंबिवली, पुण्यासहीत कोरोनाचं थैमान सुरु आहे. त्यात जीवावर उदार होऊन पूर्ण क्षमतेने रस्त्यावर कर्तव्य निभावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण झाली असून अनेकांचे जीव कोरोनामुळे गेले आहेत. मात्र राज्य सरकारने यावर मोठ्या आर्थिक मदतीची घोषणा देखील केली होती, जी फसवी असल्याची भावना पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय व्यक्त करत आहेत.

राज्यातील पोलिस दल कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहेत. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा कोरोनाची लागण झाल्यामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषित केलं होतं.

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्या बैठकीला स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आदींसह अर्थ, आरोग्य, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मागील चोवीस तासांत राज्यात आणखी ६७ पोलीस करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सद्यस्थितीस १ हजार ९७ पोलिसांवर करोनाचा उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या ५९ वर पोहचली आहे.

 

News English Summary: 67 police personnel found positive for COVID19 in the state in last 24 hours, taking the total number of active cases to 1,097 and death toll to 59 in the force: Maharashtra Police.

News English Title: 67 police personnel found positive for COVID19 in the state of Maharashtra News Latest Updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x