15 December 2024 6:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

विरोधकांवर तुटून पडणारा भाजप प्रकाश आंबेडकरांवर टीका का करत नसावा? सविस्तर

BJP, BJP Maharashtra, Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi, VBA

पुणे : महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांतच होणार असून, वंचित बहुजन आघाडीला निवडणूक लढविण्यासाठी निवडणूक आयोगाने कपबशी गायब करून गॅस सिलिंडर हे चिन्ह दिलं आहे. तसेच वंचित आघाडीकडूनही २८८ जागा लढविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र आता मतदारांंपर्यंत कपबशी ऐवजी गॅस सिलेंडर हे नवे चिन्ह पोहोचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

‘वंचित’ने २८८ जागा लढवण्याचा उद्देशाने राज्यभरात उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा सपाटा सुरू केला होता. मात्र, पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे ही प्रक्रिया मंदावली होती. विधानसभा निवडणुकीत वंचितला आघाडीत सामावून घेण्यासाठी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील राजगृहावर अ‍ॅड. आंबेडकर यांची नुकतीच भेट घेतली. मात्र, जागावाटपाबाबततिढा अद्यापही सुटलेला नाही.

दरम्यान, वंचित आघाडीची स्थापना झाल्यापासून प्रकाश आंबेडकर सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना दिसले. मात्र भाजपचे दिल्ली ते गल्लीतील प्रतिक्रिया देण्यास उतावळे असणारे नेते आणि प्रवक्ते काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि अगदी मित्रपक्ष शिवसेनेवर देखील तिखट किंवा संयमाची प्रतिक्रिया देताना दिसतात. मात्र त्यात प्रकाश आंबेडकर यांना कधीही लक्ष केलं जात नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. किंबहुना भाजप नेत्यांची प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीतील एकूणच देहबोली म्हणजे त्यांना दिल्लीतूनच काही सूचना आहेत का? असा संशय राजकीय विश्लेषक व्यक्त करतात.

काँग्रेस-राष्ट्रवादी वंचित आघाडीमुळे नुकसान होऊन देखील आजही संयमाची भूमिका घेत आघाडीची हात पुढे करत आहेत. मात्र प्रकाश आंबेडकरांच्या एकूण मागण्या विचारात घेता, ते जाणीवपूर्वक अशा मागण्या करतात ज्या देशातील कोणताही पक्ष मान्य करणार नाही. वास्तवापेक्षा अवास्तव प्रतिक्रियांवरच प्रकाश आंबेडकरांचा भर असतो आणि आघाडी होऊच नये अशी त्यांची इच्छा आहे का? अशी शंका राजकीय विश्लेषक बोलून दाखवतात. एखाद्या पक्षाला चालून आलेली संधी एखादा नेता इतक्या सहज कशी काय हातून घालवतो हे विरोधकांना समजण्या पलीकडील आहे. एका बाजूला भाजप आणि आरएसएस’वर टीका करून मी भाजप आणि आरएसएस विरोधी असल्याचं दाखवून आरएसएस संबंधित लोकांना पक्षात महत्वाची जवाबदारी देऊन मूळचे आंबेडकरी विचारांचे नेते पक्षातून बाहेर फेकले गेले अशी खंत पक्षातीलच लोकं बोलून दाखवत आहेत. एकाबाजूला मराठा समाजात आरक्षणाच्या नावाने स्वतःकडे खेचण्याचं राजकरण, तर दुसऱ्या बाजूला भाजपाला कधीच न मिळणारी आंबेडकरी विचारांची मतं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे देखील जाऊ द्यायची नाहीत आणि उरलेली मुस्लिम मतं त्याच वंचित आघाडीचा भाग असलेल्या एमआयएम’कडे वर्ग करायची आणि त्यासाठीच ही योजना असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. त्यामुळे टीका केलीच तर ती केवळ ओवेसी किंवा एमआयएम’वर करून मुस्लिम मतं त्यांच्याकडे वर्ग करायची राजकीय चाणक्यगिरी असंच म्हणावं लागेल.

दरम्यान पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘रिपब्लिकन’ हा राजकीय विचार संपविण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकरांकडून होत आहे असं कवाडे म्हणाले आहेत. तसेच त्यांनी वंचित बहुजन आघाडीवरही जोरदार टीका केली. बुलढाणा येथील पत्रकार परिषदेत बोलताना कवाडे यांनी ‘आंबेडकरांनी वंचित आघाडी तयार केली मात्र त्यात रिपाइला कुठेच स्थान नसल्याचही त्यांनी सांगितलं. याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला. त्यांना जर रिपाइचे विचार वाढवायचे असते तर त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या समोर उमेदवार उभा केला नसता असंही कवाडे म्हणाले.

पुढे बोलताना ‘भाजपचं वंचितला चालवित असल्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सध्या आम्ही महाआघाडीचा घटक आहोत, त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जागा वाटपाची चर्चा झाली आहे. मात्र आमचा सन्मान केला गेला नाही, तर मात्र आम्ही स्वबळावर राज्यात ५१ जागा लढवू’ असंही कवाडे म्हणाले.

तत्पूर्वी, ठाण्यात मंगळवारी एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे हेदेखील उपस्थित होते. प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडी सुरू केली असली तरी त्यात रिपाइंला कुठेच स्थान नसल्याचेही त्यांनी सांगितले. याचा प्रतत्य लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला. त्यांना जर रिपाइंचे विचार वाढवायचे असते तर त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर उमेदवार उभा केला नसता असाही आरोप त्यांनी यावेळी केला. एकूणच भाजपवाली मंडळीच या वंचितला चालवित असल्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीची कपबशी गायब करून गॅस सिलिंडर हे चिन्ह दिले आहे. वंचित आघाडीनही २८८ जागा लढविण्याची तयारी केली आहे. त्यांना आता मतदारांंपर्यंत पुन्हा नवे चिन्ह पोहोचविण्याची कसरत करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाने कपबशी हे चिन्ह आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला दिले आहे. त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांना आता ‘सिलिंडर’ घरोघरी पोहोचविण्यासाठी कसरत करावी लागेल. वंचितच्या सर्व उमेदवारांसाठी हे एकच चिन्ह असेल.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x