21 March 2023 12:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Godawari Power and ISPAT Share Price | ही कंपनी शेअर बायबॅक करणार, रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक दर पाहून पैसे लावा Viral Video | काळजाचा ठोका चुकला! सिनेमाप्रमाणे घडलं, ती समुद्रात उडी मारणार इतक्यात टायगर शार्क आला आणि...? Children Mobile Addiction | मोबाइलचे व्यसन मुलांसाठी खूप धोकादायक, फॉलो करा या टिप्स, मुले स्वत: सोडून देतील मोबाईल Smart Metering Transition | उन्हाळ्यात वीज बिल कमी होईल, केंद्र सरकारने सांगितली पद्धत, त्यासाठी हे आजच करा SBI Bank Account Alert | एबीआय बँक ग्राहकांना महत्वाचा अलर्ट, तुमच्या खात्यातूनही पैसे कापले गेले असतील पहा, किती रक्कम? IRCTC Railway Confirm Ticket | कन्फर्म तिकीटाशिवाय ट्रेनमध्ये प्रवास कसा करावा? अडचणीच्या वेळी हा नियम लक्षात ठेवा PPF Scheme Update | पीपीएफ योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर, 31 मार्चला इतके वाढीव पैसे खात्यात जमा होणार
x

अँटिलिया केस | NIA' कडून मुकेश अंबानींच्या घराबाहेरील सुरक्षारक्षकांची चौकशी

Mukesh Ambani, Antilia bomb scare, NIA raids

मुंबई, १० मार्च: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर 25 फेब्रुवारीला आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पियो गाडीचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेच (NIA) ने सुरु केला आहे. मंगळवारी एक टीम मुंबईत पोहचली आहे. या टीमने मुंबईत येताच विविध ठिकाणी छापेमारी सुरु केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NIAची टीम स्कॉर्पियो गाडीच्या मागे दोन वेळेस दिसून आलेल्या इनोव्हा गाडीच्या तपासाच्या अत्यंत जवळ पोहोचली आहे.

अँटिलियामध्ये गेली NIA टीम:
या टीमला एक IG (इंस्पेक्टर जनरल) लेव्हलचा अधिकारी लीड करत आहे. मंगळवारी एका टीमने अँटिलियामध्ये जाऊन तेथील सुरक्षा कर्मचारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची चौकशी केली. तेथील CCTV फुटेजही ताब्यात घेतले आहे. अशीही माहिती समोर येत आहे की, टीम आज या घटनेचा सिन रिकन्स्ट्रक्शन करेल.

दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यासमोर स्फोटकांसह सापडलेली स्कॉर्पिओ गाडी ज्यांची होती ते मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीमध्ये ५ मार्च रोजी सापडला होता. हिरेनची पत्नी विमला यांनी एटीएसला दिलेल्या जबाबाची प्रतच यांनी मंगळवारी सभागृहात फडकवली. त्यामुळे सभागृह अवाक् झाले.

 

News English Summary: The National Investigation Agency (NIA) has launched an investigation into a Scorpio car packed with explosives found outside industrialist Mukesh Ambani’s Antilia home on February 25. A team has reached Mumbai on Tuesday. As soon as this team arrives in Mumbai, it has started raids at various places. According to sources, the NIA team has come very close to investigating the Innova vehicle that appeared twice behind the Scorpio vehicle.

News English Title: Mukesh Ambani Antilia bomb scare NIA raids on arrival in Mumbai news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x