निगेटीव्ह रुग्णावर कोरोनाचे उपचार, ३ लाख फक्त महागड्या इंजेक्शनवर खर्च

कल्याण, ९ जुलै : कोरोनाचे धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ६ हजार ८७५ कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर २१९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या २ लाख ३० हजार ५९९ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ५५ टक्के आहे. राज्यात करोना मृत्यु प्रमाण ४.१९ टक्के आहे तर एकूण केलेल्या चाचण्यात पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या १८.८६ टक्के इतकी आहे.
आज २१९ मृत्यूंची नोंद झाली. त्यात मुंबईतील ६८, ठाणे ८, ठाणे मनपा २०, नवी मुंबई मनपा ५, कल्याण डोंबिवली मनपा १८, उल्हासनगर मनपा ३, भिवंडी निजामपूर मनपा ९, मीरा भाईंदर मनपा ३, पालघर १, वसई विरार मनपा ७, रायगड ९, पनवेल मनपा ८, नाशिक ३, नाशिक मनपा १, अहमदनगर १, अहमदनगर मनपा १, जळगाव ६, जळगाव मनपा १, नंदूरबार २, पुणे २, पुणे मनपा १८, पिंपरी चिंचवड मनपा ७, सोलापूर ४, सोलापूर मनपा ४, सातारा ३, जालना १, लातूर मनपा १, नांदेड १, अमरावती मनपा १, नागपूर १, नागपूर मनपा १, अन्य राज्य/ देशातील १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दुसरीकडे कोरोना टेस्ट लॅब आणि इस्पितळांचा भोंगळ आणि संतापजनक कारभार समोर आल्याने राज्य सरकारविरोधात सर्वत्र सुप्त संताप पसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. कल्याणमधील एका खाजगी रूग्णालयाच्या गलथान कारभारामुळे कोविड रिपोर्ट निगेटिव्ह असणाऱ्या महिलेवर कोविड पॉझिटीव्ह असल्याचे सांगून कोविड उपचार करण्यात आले. तर या प्रकारानंतर दोन खाजगी हॉस्पिटल आणि लॅबने एकमेकांकडे बोट दाखवत जवाबदारी झटकली आहे. याप्रकरणी दोषी असलेल्या या दोन्ही हॉस्पिटल आणि लॅब विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे.
कल्याण पश्चिमेतील आधारवाडी येथे राहणारे अजय सावंत यांची बहीण नीता सावंत हिला बरे वाटत नसल्याने ३ जुलै रोजी सिटी क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ४ जुलै रोजी कोविड चाचणी करण्यात आली. ५ जुलै रोजी कोविड चाचणी रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे सागंत रुग्ण नीताला इमर्जन्सी कल्याण पश्चिमेतील ए अँन्ड जी या कोविड रूग्णालयात नेण्यास सांगितले. त्याप्रमाणे नीताला ए अँन्ड जी रूग्णालयात दाखल केले. तेथे ४५ हजार किंमतीचे इंजेक्शन आणण्यासाठी सांगितले. कल्याणात इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने मोठ्या कसरतीने मुंबईहुन आणले. ते इंजेक्शन नीताला दिल्यानंतर ३५ हजार किंमतीचे ६ इंजेक्शन आणण्यास सांगितले. ते देखील मोठी तारेवरची कसरत करून आणले.
यानंतर रुग्णालयाने पुन्हा ४५ हजार किंमतीचे इंजेक्शन आणण्यास सांगितले ते आणण्यासाठी मेडिकलवाल्याने कोविड रिपोर्ट लागत असल्याने ए अँन्ड जी या रुग्णालयाकडून झेरोक्स दिली गेली असता झेरॉक्सची प्रत पाहता मेडिकलवाल्याने हा रिपोर्ट अजय यांची बहीण नीता हिचा नसल्याचे निदर्शनास आणून दिले. तो रिपोर्ट नीता सावंत नामक ४५ वर्षी य दुसऱ्या महिलेचा असल्याने अजय सावंत यांची बहीण नीता हिस प्लेटलेट कमी असल्याच्या उपचारार्थ मीरा रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकुती स्थिर आहे.
याप्रकरणी रुग्णालय आणि लॅबचा परवाना रद्द करण्याची मागणी अजय सावंत यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे, कल्याण-डोंबिवली महानगर पालिका, पोलीस आयुक्तांना केली आहे. दरम्यान, सिटी क्रिटिकेयर रुग्णालय प्रशासनाने हात झटकले असून लॅबकडून आलेल्या रिपोर्टनुसार त्यांना उपचारासाठी कोविड रुग्णालयात पाठवले असे सांगितले. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकरी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी या प्रकरणी तक्रार प्राप्त झाली असून शहानिशा करून कारवाई करू अशी प्रतिक्रिया दिली.
News English Summary: Ajay Sawant has demanded cancellation of hospital and lab licenses in this regard to Health Minister Rajesh Tope, Kalyan-Dombivali Municipal Corporation and Commissioner of Police. Meanwhile, the City Criticare Hospital administration shook hands and said he was sent to Covid Hospital for treatment, according to a report from the lab.
News English Title: Hospital was treating negative report patient as covid 19 positive patient News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL