28 April 2024 7:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

मुंबईतील 'त्या' प्रवाशांना कोरोनाची बाधा नाही - आरोग्य मंत्री राजेश टोपे

Corona Virus, test negative, Pune, Mumbai

मुंबई: राज्यातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दोन दिवसांत ५ वर पोहचली आहे. पुण्यातील दुबईहून परतलेल्या एकाच कुटुंबियांतील तिघांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील कोरोनाचा धक्कादायक आकडा समोर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (आज) बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे.

दुबईहून परतलेल्या आणि पुण्यातील जोडप्याच्या संपर्कात आलेल्या मुंबईतील सहा प्रवाशांच्या आरोग्य चाचणीचा अहवाल आला आहे. या प्रवाशांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. स्थानिक माध्यमांशी साधलेल्या संवादात त्यांनी ही माहिती दिली.

या रुग्णांना कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. मात्र, त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. पुण्यातील दाम्पत्यासोबत सहलीसाठी गेलेल्यामध्ये यवतमाळ, मुंबई, ठाणे अशा ठिकाणच्या अनेक व्यक्तींचा समावेश होता. प्रवासादरम्यान या जोपडप्याच्या संपर्कात आलेल्या ४० प्रवाशांचाही शोध लागला असून त्यांना आरोग्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत, तसेच त्यांची तपासणीही होणार आहे अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली.

तसेच कोरोनासंदर्भात अनेक अफवा पसरल्या आहेत. पण, चिकन-मटण खाल्ल्याने कोरोना व्हायरल होत नाही, असे स्वत: अजित पवार यांनी सांगितले. तसेच, कोरोनासंदर्भात सरकारकडून एक मेसेज देण्यात आला आहे, तो जास्तीत जास्त लोकांच्या मोबाईलवर पोहोचला पाहिजे. आपण, तो मेसेज व्हायरला करावा. त्यामुळे, कोरोनासंदर्भातील अफवा दूर होतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्यातील चिकन मार्केट असोसिएशन अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

मुंबईत करोनाचा एकही रुग्ण नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात करोनाचे ५ रुग्ण आढळले असून स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

News English Summery: A health test has been reported for six passengers in Mumbai who have returned from Dubai and contacted the couple in Pune. No signs of corona were detected in the passengers, Health Minister Rajesh Tope said. He gave this information in a dialogue with local media. The patients did not have coronary infection, the health minister said. However, they will be kept under surveillance, he said. The couple who went for a trip with the couple in Pune included many people from places like Yavatmal, Mumbai, Thane. The Health Minister informed that 40 passengers who were in contact with the couple were also informed about the health issues.

 

Web News Title: story corona virus six people corona test negative who recently travel with Pune couple.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x