पुण्यात कोरोनाचे दोन रुग्ण; महापालिकेकडून २०० खाटांचं रुग्णालंय सज्ज
पुणे: जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसने महाराष्ट्रातही शिरकाव केला असून पुण्यात दोन रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोघांनाही नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून देखरेखेखाली ठेवण्यात आलं आहे. करोना कक्षात त्यांना ठेवण्यात आलं आहे. दरम्यान करोनाचे रुग्ण आढळल्याने शहरात चिंतेंचं वातावरण असून पूर्वकाळजी म्हणून आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची सूचना देण्यात आली आहे.
#coronavirus दोन संशयित रुग्ण पुणे येथे आढळून आले. दोघांवर लक्षणांवर आधारित उपचार सुरू झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. धुलिवंदनाचा सण साजरा करताना होणारी गर्दी नागरिकांनी टाळावी.
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 10, 2020
कोरोनाच्या रुग्णांसाठी वेगळ्या हॉस्पिटलची आणि आयसोलेशन वॉर्डसची गरज असल्याने अवघ्या काही तासांमध्ये पालिकेने 200 खाटांची व्यवस्था केली असून लवकरच हे तात्पुरतं हॉस्पिटल सुरु होणार आहे. राजयोग सोसायटी आणि सणस मैदानातील इमारतीत हे तात्पुरते रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी कोरोनाची लागण झालेल्या 2 रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांचे विलगीकरण करण्यात येणार आहे. यासाठी डॉक्टरांचे पथक आणि इतर यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याची महिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सतर्क राहावे, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना केले आहे. तसेच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यासही सुरूवात करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
तसेच, धुलिवंदनाचा सण साजरा करताना होणारी गर्दी नागरिकांनी टाळावी. सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता पाळावी. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवावा. मास्क ऐवजी तोंडाला रुमाल वापरावा, असे आवाहनही आरोग्यमंत्री यांनी केले आहे. कोरोनाच्या संशयित रुग्णावर लक्षणांवर आधारित उपचार केले जात असून केरळ येथेही तीन रुग्ण आढळून आले होते त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांचे नमुने पुन्हा निगेटीव्ह आल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
News English Summery: Concerns have been raised as two coronary patients were found in Pune. Recognizing the seriousness of the situation, the Pune Municipal Corporation has started work at the war level. Due to the need for a separate hospital and isolation wards for Corona patients, the municipality has arranged 200 beds in the first few hours and this hospital will be opened soon. The temporary hospital has been started in the Rajyoga Society and Sanas Maidan. Other citizens who have been in contact with 2 coronary infected patients will be separated at this place. Municipal administration has informed that a team of doctors and other machinery have been prepared for this.
Web News Title: Story 2 corona affected patients found in Pune city Pune municipal corporation made 200 beds temporary hospital.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News