4 May 2025 5:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY Trident Share Price | शेअर प्राईस केवळ 26 रुपये; यापूर्वी दिला 5230% परतावा; फायद्याची अपडेट आली - NSE: TRIDENT Motherson Sumi Wiring Price | 55 रुपयांचा शेअर फोकसमध्ये; पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MSUMI IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB
x

३ टक्के प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांसाठी ९७ टक्के पुणेकरांना वेठीस का धरता? - गिरीश बापट

BJP MP Girish Bapat, opposed lockdown, Pune district

पुणे, ११ जुलै: पुण्यातील वाढती करोनाबाधितांची संख्या पाहून शहरात आणि पिंपरीमध्ये सोमवारपासून कडक लॉकडाउन घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या या निर्णयाला मात्र भाजपा खासदार गिरीश बापट यांच्याकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. “मास्क लावला नाही, शारीरिक अंतर पाळले नाही तर कडक कारवाई करा; पण ३ टक्के प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांसाठी ९७ टक्के पुणेकरांना वेठीस का धरता? आम्ही सहकार्य करू, पण लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या असं म्हणत बापट यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

गिरीश बापट पुढे म्हणाले की, “कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करायला पाहिजेत. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून योग्य अंमलबजावणी होऊ शकते. मात्र त्यांना विश्वासात घेतलं जात नाही. केवळ दिवस पुढे ढकलल्याने संख्या कमी होणार नाही. सर्व पुणे शहराला वेठीस धरले जात आहेत.’

“या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार पुन्हा बुडणार आहे. सरकारनं बारा बलुतेदारांना काहीच पॅकेज दिलं नाही. यामुळे उपासमारीची भीती असून, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं आहे”, असं बापट यांनी सांगितलं.

“लॉकडाउन जाहीर करताना खासदार आमदारांच्या सूचना विचारल्या नाहीत. केंद्रात नरेंद्र मोदींनी सर्व विरोधी पक्षनेत्यांना बोलवलं, त्यांचा सल्ला घेतला. मात्र तसं पुण्यात होत नसून, मनमानी कारभार असल्याचा आरोप बापट यांनी केला. यामुळं लोकांमध्ये असंतोष निर्माण होईल. लोक ऐकत नसतील तर दंडात्मक कारवाई करा. मात्र दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. जीव जसा महत्वाचा आहे त्यानुसार जीवन सुद्धा महत्वाचं आहे. असे एकतर्फी निर्णय घेतले तर आम्हाला आमचे निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा बापट यांनी दिला.

 

News English Summary: Why hold 97% Punekars hostage for 3% restricted area people? We will cooperate, but trust the people’s representatives said BJP MP Girish Bapat expressed his displeasure News Latest Updates.

News English Title: BJP MP Girish Bapat opposed lockdown in Pune district News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या