19 October 2021 8:42 AM
अँप डाउनलोड

पुरग्रस्तभागाला १०० टक्के कर्जमाफी द्या; एनसीपीच्या प्रतिनिधींकडून ५० लाखांची मदत: शरद पवार

NCP, Sharad Pawar, Rashtrwadi Congress Party, Kolhapur Flood, Sangali Flood

कोल्हापूर : सांगलीत आलेल्या महापूरामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची ‘शिवस्वराज्य’ यात्रा स्थगित केली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आज पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या पुराबाबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

यावेळी पवार म्हणाले की, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, शासकीय पातळीवर सर्व मदत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे, पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी मिळून 50 लाख रुपयांची मदत पूरग्रस्तांना करणार आहेत.

ऊसाचे वैशिष्ट्य त्या पिकाच्या उंचीपेक्षा जास्त पाऊस आले तर पीक वाया जाते. काही ठिकाणी फळबागांमध्ये द्राक्ष, डाळींब यांचे उत्पादन घेतले जाते, भाज्या घेतल्या जातात. शेतपिकाबरोबर बर्‍याच ठिकाणी जमिनीवरील माती वाहून गेल्याचे दिसत आहे, अशा शेतजमिनींचे कायमस्वरूपी नुकसान झाले आहे. आता पाणी ओसरेल, तेव्हा या नुकसानीचा खरा आढावा घेता येईल. बांधलेली जनावरे शेतकर्‍यांनी सोडून दिली. कोल्हापूर, सांगली हा पट्टा महाराष्ट्रातील विकासाचा महत्त्वाचा पट्टा आहे, अशी स्थिती पूर्वी कधी पाहण्यात आली नव्हती. राज्य सरकारने नुकसान भरपाईची सुरू केली पाहिजे. पंजनामे सुरू केले पाहिजे. तसेच पुरग्रस्तभागातील लोकांना १०० टक्के कर्जमाफी दिली पाहीजे”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत केली आहे.

हॅशटॅग्स

#NCP(371)#Sharad Pawar(421)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x