7 July 2020 10:12 PM
अँप डाउनलोड

BLOG: व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्य

Health, exercise, BLOG, mental health, exercise and mental health

मुंबई : व्यायाम हा आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आपण शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावं ह्यासाठी सगळेच व्यायाम करतात पण ह्या व्यायामाचे मानसिकदृष्ट्या देखील तितकेच फायदे असतात. जे नियमितपणे व्यायाम करतात ते दिवसभर उत्तेजित असतात व त्यांना सहसा काही आजार होत नाही, झोप नीट लागते, बुद्धी तल्लख होते त्याचसोबत नियमितपणे व्यायाम केल्याने मानसिक ताण दूर व्हायला देखील मदत होते.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

व्यायाम आणि औदासिन्य:
आताच्या दगदगीच्या व प्रचंड वैयक्तिक प्रोब्लेम असलेल्या आयुष्यात औद्सिन्य हे सगळ्यांनाच येत. व्यायाम करणे हा औदासिन्याला एक सोपा उपचार आहे असं आपण म्हणू शकतो. व्यायाम केल्यामुळे शारीरिक व मानसिक ताण कमी व्हायला मदत होते. व्यायाम मेंदूमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ज्यामुळे आपला मेंदू, पर्यायाने मन शांत होते. तसेच व्यायाम आपल्याला रोजच्या त्रासदायक गोष्टींमधून लक्ष विचलित करतो, त्यामुळे नेहमीच्या दगदगीतून एक छोटा ब्रेक मिळतो असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.

व्यायाम आणि चिंता:
निःचिंत होण्यासाठी व्यायाम हा सगळ्यात उत्तम उपाय आहे. व्यायाम केल्याने आपल्या शरीरात आपसूकच एक ऊर्जा निर्माण होते आणि त्याचा परिणाम हळू हळू मनावर देखील होतो. म्हणूनच व्यायाम करत असताना, आपल्या शरीरातील श्वसनक्रियेत देखील फरक पडतो, आजूबाजूच्या वातावरणाचा फरक आपल्यावर पडतो आणि केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक शांतता देखील मिळण्यास मदत होते.

व्यायाम आणि ताण:
जेव्हा आपण ताणाखाली वावरत असतो तेव्हा आपल्याला शारीरिक व्याधी होण्याची शक्यताही जास्त असते. कधी कधी स्नायूंचे दुखणे वाढते तर कधी मणका देखील दुखू शकतो. व्यायाम केल्याने ह्या शरीरातील त्रासदायक गोष्टी घडण्याची शक्यता फारच कमी असते.

व्यायामामुळे अजून काही फायदेशीर गोष्टी…

  1. तल्लख बुद्धीमत्ता.
  2. आत्मविश्वास वाढतो.
  3. झोप वेळेवर येणे.
  4. सकारात्मकता वाढते.
  5. शरीरातील लवचिकता वाढणे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Health(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x