11 July 2020 12:20 PM
अँप डाउनलोड

पावसाळ्यात सर्दी पडसे अशा आजारांपासून काळजी कशी घ्याल: सविस्तर

Rain, Health, Precautions

मुंबई : पावसाळा सुरू झाल्यामुळे सर्वत्र सर्दी पडसे व्हायला सुरुवात झाली आहे. पण या सर्दी पडस्याच स्वरूप काही काही वेळा वाढून त्याच रूपांतर व्हायरल फिवर मध्ये होऊ शकतं. व्हायरल फिवर बहुतेकदा व्हायरल इन्फेक्शन मुळे होण्याची शक्यता असते. मानवी शरीराच सरासरी तापमान हे साधारणपणे ९८.६ अंश सेल्सिअस असते. हे तापमान जर १ किंवा त्यावर गेले तर त्याला आपण ताप येणे असं म्हणतो. पण व्हायरल फिवर हा सध्या अँटीबायोटिक्सने जात नाही. पाहूया तर, व्हायरल फिवर झाला तर काय काळजी घ्यायची.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

१. व्हायरल फिवरमुळे डीहायड्रेशन होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी, ज्यूस, सूप व अजून पातळ पदार्थ ज्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होणार नाही अशा पदार्थांचे ग्रहण करावे.

२. जमेल तितका आराम करावा. व्हायरल फिवरमुळे शरीरात अशक्तपणा वाढतो. त्यात अजून धावपळ केल्याने चक्कर येणे, शरीरातील ताकद कमी होणे, हातपाय गळणे आदी गोष्टी घडण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्तीत जास्त आराम करावा.

३. व्हायरल फिवरमुळे अन्नवरची वासना उडणे, घसा खवखवणे, डोके दुखणे, शरीरात ऊर्जा नसणे अशा बऱ्याच व्याधी घडू शकतात. त्यामुळे व्हायरल फिवरला दुर्लक्ष न करता वेळेत डॉक्टर कडे जाऊन उपचार घेणेच फायद्याचे ठरेल.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x