18 August 2019 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अर्थमंत्र्यांची पत्नी विश्वस्त पदी; तिरुपती देवस्थानला २०० कोटींचा भूखंड १ रुपया दराने; सरकारचा पराक्रम काश्मीरबाबत पाकमध्ये उच्चस्तरीय बैठक सुरु; सैन्य दलाचे अधिकारीही उपस्थित मी तिथे होती, दिल्ली विद्यापीठात घोषणाबाजीवेळी कन्हैय्या कुमार तेथे नव्हता: भाजप खासदाराची पत्नी सत्तेत आपल्या विचाराचे लोक आहेत; आम्ही सरकारी धोरणात हस्तक्षेप करतो, पण...... बहुमताच्या जोरावर शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू का केला नाही: बच्चू कडू ‘वंचित’कडून २८८ जागा लढण्यासाठी मोर्चेबांधणी; भाजप-सेना देखील स्वबळावर? सविस्तर कारण उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राणे परत आले तर मी घर सोडीन’
x

पावसाळा म्हटलं कि मजा मस्ती, चमचमित खाणे आलेच; पण आजारपणा देखील

पावसाळा म्हटलं कि मजा मस्ती, चमचमित खाणे आलेच; पण आजारपणा देखील

मुंबई : पावसाळा म्हटलं कि मजा मस्ती, चमचमित खाणे ह्या सगळ्या गोष्टी आल्याचं, पण पावसाळ्यात सगळ्यात जास्त भीती असते ती आजारपणाची. ताप, सर्दी, खोखला, ह्या सगळ्या गोष्टींसोबतच सगळ्यात जास्त महत्वाचं असत ते म्हणजे पावसाळ्यात केसांची काळजी घेणं. केसांत पावसाचं पाणी पडलं कि कोंडा होणं, केस रखरखीत होणं ह्या सगळ्या गोष्टी घडतातच. पण सगळ्यात जास्त महत्वाचं असत ते म्हणजे केस गळती थांबवणे. केवळ पावसाळ्यातच नव्हे तर केस गळण हा त्रास सगळ्यांना वर्षभर असतो. परंतु पावसाळ्यात ह्याचे प्रमाण जास्त आहे. चला तर पाहूया… पावसाळ्यात केस गळती कशी थांबवायची ते!

१. केस वेळच्या वेळी सुकवा: केस वेळच्या वेळी सुकवल्याने ओलसरपणा व हवेतील आद्रतेमुळे केस तुटण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे केस वेळेवर सुकवल्याने त्यांच्या गळण्याचे प्रमाण कमी होते.

२. पौष्टिक खाणे खा:  हिरव्या भाज्या, फळे, बदाम, मनुका, अंड व अनेक प्रथिने युक्त गोष्टी केसांत मुळांना जोर देतात व भक्कम करतात ज्यामुळे केसांचे गळणे कमी होते.

३. जास्तीत जास्त पाणी पिया: शरीरातील पाण्याचे प्रमाण जरी कमी झाले तरी देखील केस गळणे होऊ शकते. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण स्थिर ठेवण्यासाठी व्यवस्थित प्रमाणात पाणी पिया.

घरच्या घरी केस गळणे टाळण्याचे उपाय:
१. लिंबाचा रस व ठेचलेला आवळा एकत्र करून ते मिश्रण केसांमध्ये मूळांपर्यंत लावा. व रात्रभर ते केसांमध्ये ठेऊन सकाळी केस धुवा.
२. कोरफडाचा गार केसांमध्ये लाऊन केस तास ते दोन तासांमध्ये कोमट पाण्याने धुवा.
३. एका वाटीमध्ये रात्री मेथीच्या बिया भिजवत ठेवा. सकाळी त्याची पेस्ट करून ती पेस्ट केसांमध्ये लावा व ४५ मिनिटांनी केस धुवून टाका. मेथी मध्ये काही असे घटक असतात ज्यामुळे केसांची मुळे भक्कम होतात.

अनुरूप वधू - वर सुचक मंडळ

हॅशटॅग्स

#Health(3)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या