4 December 2020 7:18 PM
अँप डाउनलोड

जगातील पहिले हायपरलुप मॉडेल भारतात आकार घेणार.

Mumbai Pune Road, Mumbai Pune Hyper loop

पुणे : आपले महाराट्र राज्य हे जगातील पहिली हायपरलुप सेवा सुरु करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुणे ते मुंबई दरम्यान पहिल्या हायपरलुप ची उभारणी होणार असून या प्रकल्पाला पूर्ण व्हायला ८ वर्षाचा कालावधी लागणार आहे. यानंतर पुणे ते मुंबई इतके अंतर अवघ्या २३ मिनिटांमध्ये कापता येणार आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

नुकत्याच महाराष्ट्र सरकार व व्हर्जिन हायपरलुप- डीपी वर्ल्ड या संयुक्त कंपन्यांच्या दरम्यान या प्रकल्पाबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. अमेरिकेतील नेवाडाच्या वाळवंटात या प्रकल्पाची पायाभरणी सुरु आहे. या प्रकल्पात एक भोगदा किंवा मोठ्या जलवाहिनीसारखी नळीवजा वाहिनी तयार केली जाते. यात कमी दाब निर्माण केला जातो. आणि घर्षणाची शक्यता पूर्ण नाश्ता केली जाते. या वाहिनीतून एक पॉड (गोलाकार वाहन) या बाजूने दुसऱ्या बाजूला वेगाने जाईल.

त्या वाहनाला चाके नसतील. ते हवेतूनच तरंगत प्रवास करेल. त्यामुळे त्याला हायपरलुप असे म्हटले जाते. तत्पूर्वी पुण्याजवळ ११.८ किलोमीटर अंतराचा पथदर्शी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या वर्षाच्या अखेरीस व्हर्जिन’कडून या कामास प्रारंभ होईल. या प्रकल्पासाठी भागीदारीत असलेल्या डीपी वर्ल्ड या कंपनीने भारतातील गुंतवणूक वाढविण्यासाठी सुरुवात केली आहे. या कंपनीने या प्रकल्पवर ५० कोटी डॉलर गुंतविले आहेत.

हॅशटॅग्स

#Technology(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x