28 July 2021 8:29 PM
अँप डाउनलोड

आताचा काळ इंटरनेट कारचा...परंतु धोक्याचा..?

Cars, Hector Car, Internet Car

मुंबई : भारतात वाहन क्षेत्र मंदीच्या खाईत अडकलेले असताना केवळ दोनच कारना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याम्हणजे इंटरनेट कर एमजी हेकटर आणि ह्युंदाई व्हेन्यू. वाढत्या तंत्रन्यानाच्या युगात या इंटरनेट कारना जास्त मागणी आहे. प्रत्येक जण काळानुसार बदलू पाहत आहे. व नवनवीन गोष्टी स्वीकारू पाहत आहे. हेक्टर या कारची बुकिंग २८ आणि व्हेनुची ५० हजाराच्या पार झाली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मात्र या कर हँकिंगची शिकार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या इंटरनेट कारवर हॅकर नियंत्रण मिळवून काहीही उत्पात घडवू शकतात. कन्झुमर अँड्व्होकसी ग्रुपने नुक्त्यात प्रकाशित झालेल्या अहवालात असा इशारा दिला आहे. या अहवालामध्ये मोठी घटना घडवून अनेक लोकांचे प्राण घेतले जाऊ शकतात असे सांगितले आहे. आता पर्यंत स्मार्टफोन, लॅपटॉप, कॉम्पुटर, सोशिअल मीडिया अकाउंट हॅक होतात असे ऐकले होते, परंतु आता पुढल्या पिढीला वाहन हॅक होण्यापासून सुद्धा धोका आहे.

अहवालानुसार कार सुरक्षेसाठी धोका निर्माण करू शकतात असे सांगितले गेले आहे. कंपन्या कार मध्ये नवनवीन फिचर लाँच करत आहेत पण तितकाच या कारची धोका वर्तवला जात आहे. वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात काळासोबत पुढे जात असताना त्या गोष्टींचे फायदे तर लक्षात घ्यावेच पण त्या गोष्टीचे फायदे सुद्धा लक्षात घ्यावे आणि मग त्या गोष्टींचा स्वीकार करावा अशी ग्राहकांना विनंती आहे. काळानुसार बदल हा हवाच व जर तो बदल आपल्यासाठी हानिकारक ठरणार असेल तर तो न स्वीकारलेलाच बरा.

हॅशटॅग्स

#cars(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x