14 December 2024 5:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

दुष्काळ: ग्रामीण जनतेची गोड्या पाण्यासाठी वणवण तर सत्ताधारी खाऱ्या पाण्यात तरंगत आहेत

MLA Ram Kadam, BJP, Drought in Maharashtra

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपून सत्ताधारी सध्या कुटुंबासोबत सुट्टीची मजा घेत आहेत. कुटुंबासोबत सुट्टीवर जाणं गैर नसलं तरी, ते कधी याचं किमान जनतेने निवडून दिलेल्या सत्ताधाऱ्यांना तरी भान ठेवणं गरजेचं आहे. भर उन्हाळ्यात राज्यात ऐतिहासिक दुष्काळ पडलेला असताना सत्ताधारी नेते मात्र स्वतःच्या उन्हाळी सुट्ट्या देशाबाहेर घालवून, पुन्हा पावसाळ्याचा आनंद लुटायला स्वगृही परततील.

तसंच काहीस भाजपचे आमदार राम कदम यांनी देखील केलं आहे. मुळात ते शहरी भागातील आमदार आहेत ही काही पळवाट होऊ शकत नाही. स्वतःच्या पक्षाच्या लोकसभेचा प्रचार करण्यासाठी हेच नेते राज्यभर फिरताना दिसले. मात्र लोकसभा निवडणूक आटोपताच सुट्ट्या आनंदात घालवण्यासाठी, राज्यातील ग्रामीण जनतेला गोड्यापाण्यासाठी वणवण करण्यासाठी सोडून गेले आहेत. मात्र विरोधकांनी दुष्काळावर बोलताच विरोधक दुष्काळाचं राजकारण करत आहेत अशी बोंब हेच सत्ताधारी करताना राज्यातील जनतेने पहिले आहे.

स्वतःच्या मतदासंघात प्रवचनावेळी हेच आमदार राम कदम माणुसकीचे धडे देताना आजही दिसत आणि मनुष्य प्राण्याच्या मदतीसाठी आपण कसं धावून गेलं पाहिजे याचं ब्राह्मण्यान सामान्य भक्तांना म्हणजे स्वतःच्या कार्यकर्त्यांना शिकवत असतात. दहीहंडी दरम्यान त्यांच्यातल्या महान आणि अध्यात्मात तल्लीन झालेल्या महापुरुषाचे रूप आणि विचार देशाने ऐकले आहेत. परंतु आता तेच सत्ताधारी पक्षाचे सर्वज्ञानी आमदार राम कदम सध्या दुष्काळामुळे गोड्यापाण्यासाठी वणवण करणाऱ्या ग्रामीण भागातील मनुष्य प्राण्याला अधांतरी सोडून विदेशात खाऱ्या पाण्यावर तरंगून सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहेत.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x