18 May 2024 11:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
x

महाराष्ट्राच्या राजभवनावर कोरोनाचा कहर, १८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

18 employees, Raj Bhavan, Covid 19

मुंबई, १२ जुलै : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. सर्वाधिक रुग्ण हे राज्याची राजधानी मुंबईत आढळले आहे. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निवासस्थान असलेले राजभवन कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. राजभवनावर १६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.

महाराष्ट्राच्या राजभवनावर कोरोनाने कहर केला आहे. राजभवनावरील १०० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यात आतापर्यंत ५५ जणांचे अहवाल हाती आले आहे. यात १८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. १८ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राजभवनातील जवळपास १८ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह असल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. राज्यपालांचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या राजभवनातील कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी १८ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं चाचणी करण्यात आली आहे.

 

News English Summary: According to ANI, about 18 employees of Raj Bhavan are positive. Employees at the Raj Bhavan, the governor’s office and residence, were tested for corona. Of these, 18 reports have come positive.

News English Title: According to ANI about 18 employees of Raj Bhavan are positive News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x