12 May 2024 8:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
x

गुजरातमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना

Doctor Babasaheb Ambedkar, statue desecrated, Sihor, Gujarat Bhavnagar

भावनगर, १४ जुलै : गुजरातमधील सिहोर जिल्ह्यात महामानव, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात कलम २९५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

काल सोमवारी मध्यरात्री काही अज्ञात समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा चेहरा झाकला. त्याचबरोबर या परिसरात पुतळ्याशेजारी रिकाम्या दारूच्या बाटल्या ठेवल्या. हे संतापजनक कृत्य काही स्थानिक नागरिकांनी आज सकाळी पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ सिहोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सोमवारी मध्यरात्री ते आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या या घटनेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे परिसरात असंतोष निर्माण झाला असून या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे.

 

News English Summary: In the Sehore district of Gujarat, the great man, His Holiness Dr. Babasaheb Ambedkar’s statue has been desecrated by unknown miscreants. Police have registered a case under Section 295 against unknown persons in this regard.

News English Title: Doctor Babasaheb Ambedkar statue desecrated in Sihor in Gujarat Bhavnagar News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x