29 March 2024 4:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

शाळा सुरु करण्याची घाई नको आणि शाळांना राजकारणात ओढू नका - WHO'चा इशारा

Coronavirus, World Health Organization, Schools Politics, WHO Mike Ryan

वॉशिंग्टन, १४ जुलै : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातला आहे. अनेक देशांनी कोरोनाला थोपवण्यासाठी लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारलेला आहे. परंतु त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असल्याची शक्यता धूसर वाटू लागली आहे. अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. एका दिवसात अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये संसर्ग झालेल्यांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रोस अ‍धॅनम घेब्रेयेसस यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या संकटाची परिस्थिती आणखी धोकादायक बनत चालल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

एकीकडे अनेक देशांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला असताना काही देश मात्र पुन्हा शाळा सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख माइक रायन यांनी शाळा सुरु करण्यासाठी घाई केली जाऊ नये असं म्हटलं आहे. तसंच शाळांना राजकारणात आणू नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे. एकदा करोना महामारीचा प्रभाव कमी झाला की सुरक्षितपणे शाळा सुरु केल्या जाव्यात असं त्यांनी सांगितलं आहे. माइक रायन यांनी यावेळी अमेरिकेसारख्या देशांमध्ये मर्यादित किंवा भौगोलिक लॉकडाउन केला जावा असा सल्ला दिला आहे. जेणेकरुन परिस्थिती हाताबाहेर गेलेल्या काही ठराविक भागांमधील संसर्ग रोखण्यात यश मिळेल.

जगात अमेरिका हा देश कोरोना संकटाचा सर्वात मोठा बळी ठरला आहे. अमेरिकेत गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे 70 हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोणत्या देशात 24 तासात झालेली ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत आतापर्यंत 31,83,856 लोकं कोरोनाग्रस्त झाले आहेत.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सध्या जगभरात १ कोटी ३२ लाख लोकांना करोनाची लागण झालेली आहे. तर मृतांची संख्या साडे पाच लाखांच्या पुढे गेली आहे. टेड्रोस यांनी यावेळी रविवारी २ लाख ३० हजार नवे रुग्ण मिळाले असून यामधील ८० टक्के रुग्ण १० देशांमधील असून फक्त दोन देशांमध्ये ५० टक्के रुग्ण मिळाले असल्याचं सांगितलं. अमेरिका आणि ब्राझिलला करोनाचा सर्वात जास्त फटका बसलेला आहे.

 

News English Summary: Mike Ryan, head of the World Health Organization’s emergency department, said there should be no rush to start school. He has also appealed not to bring schools in politics.

News English Title:  Coronavirus World Health Organization Urge Countries Not To Make Schools Into A Political Football News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x