4 May 2024 12:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

अखेर सरकारला जाग, गुणपत्रिकेवर प्रमोटेड कोविड-१९ चा शिक्का नसेल याची हमी

Promoted covid19 seal, Maharashtra government, Agriculture Student

दापोली, १४ जुलै : कोविड-१९मुळे ज्यांच्या परीक्षा घेतलेल्या नाहीत अशांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा शिक्का मारण्याचा अजब प्रकार कृषी विद्यापाठांत दिसून आला. यानंतर विद्यार्थी आणि पालक यांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून असे काहीही आदेश देण्यात आलेले नाहीत. याबाबत चौकशी करुन कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली.

कृषी विद्यापीठांचा अजब प्रकार समोर आल्यानंतर राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा शिक्का मारायला सांगितलेले नाही. कृषी विद्यापीठांतील गुणपत्रिकेवर ‘ प्रमोटेड कोविड-१९’ असा शिक्का मारणे हा अजब प्रकार आहे. विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल, अशी माहिती विधिज्ञ असीम सरोदे यांनी दिली. याबाबत जर राज्य शासनाने योग्य पाऊल उचलेले नाही तर आपण याबाबत आवाज उठवणार आहोत, अशी माहिती असीम सरोदे यांनी दिली. मार्कशिटवर ‘प्रमोटेड कोविड-१९’ शिक्का मारणे हा विषमता अधोरेखित करण्यासारखा प्रकार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, असे ते म्हणालेत.

प्रसार माध्यमांनी विषय उचलून धरताच ही चूक ज्यांनी केलीय त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहे. तसेच २४७ विद्यार्थ्यांना दिलेली कोविड- १९ ची प्रमाणपत्रे परत घेतली जातील आणि त्यांना कोविडचा शिक्का नसलेली नवीन प्रमाणात दिली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात चार कृषी विद्यापीठे आहेत. काही विद्यार्थ्यांची परीक्षा झाली होती. मात्र, कोरोनाचा फैलाव सुरु झाल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे अनेकांच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे वर्षाभरातील सरासरी गुणांची लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना गुण देत गुणपत्रिका देण्यात आल्या. मात्र, काहींच्या गुणपत्रिकेवर प्रमोटेड कोविड-१९ चा शिक्का मारण्यात आला. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यांतर कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी कृषीचे शिक्षण घेणार्‍या राज्यातील सर्व २८ हजार विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र देताना त्यावर कोविडचा कोणताही शिक्का नसेल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कृषीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

News English Summary: Agriculture Minister Dadaji Bhuse while giving marks and certificates to all 28,000 students studying agriculture in the state has clarified that there will be no seal of Kovid on it. This has been a great relief to the students of agriculture.

News English Title: Promoted covid19 seal great relief from the Maharashtra government to 28000 students of agriculture News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x