हातकणंगलेचे माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
कोल्हापूर, १६ डिसेंबर: राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल भारतीय जनता पक्षाचा चांगलाच समाचार घेतला होता. पदवीधर लोकांनी पराभव केला हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना खूपच झोंबलं आहे, असं म्हणत अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावला होता.
‘पुण्यात चंद्रकात पाटील प्रतिनिधीत्व करत होते, पण आमचा उमेदवार पहिल्या फेरीतच निवडून आला. तीच गोष्ट औरंगाबाद, सतिश चव्हाण तिथे प्रचंड मतांनी निवडून आले. धुळे-नंदुरबारची जागा अमरिश पटेल यांना भारतीय जनता पक्षाने तिथं घेतल्याने आली. अमरावतीला चुकलं, पण एक समाधान आहे तिथं भारतीय जनता पक्षाचा आला नाही. शिक्षक आणि पदवीधर हा हुशार वर्ग… याच वर्गाने प्रचंड ताकदीने निवडून दिलं आहे. आता मला त्यांना सांगणं आहे की आमच्याकडून तुमच्याकडे गेलेत ते कधी राजीनामा देतील आणि आमच्याकडे येऊन निवडून येतील ते सांगता येत नाही, त्यांच्यावर लक्ष ठेवा,’ असा टोला अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाला लगावला होता.
दरम्यान, आज जनसुराज्य पक्षाचे नेते आणि हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पायाला भिंगरी बांधल्यासारखे पवारसाहेब आज काम करत आहेत. या वयातही प्रचंड काम करणारा नेता देशात दुसरा कुणी नाही हे नाकारता येणार नाही, राजकीय जीवनात पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ३० वर्षे काम करतोय. यामध्ये अनेक लोकांची ओळख होत असते. त्यामध्ये जनसुराज्य पक्षाचे काम करताना राजीव आवळे यांचं काम मी पहात आलो आहे. ते गरीब व वंचित वर्गासाठी काम करत आहेत असं अजित पवार यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाने धमक्या दिल्या होत्या आणि प्रवेश करुन घेतला होता ते सर्व आज राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्याची सुरुवात आज राजीव आवळे यांच्या प्रवेशाने होत आहे असा टोला यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भारतीय जनता पक्षाला लगावला आहे.
News English Summary: Rajiv Awale, leader of Jansurajya Party and former MLA of Hatkanangale assembly constituency, joined the NCP along with many of his activists. All those who were threatened and admitted by the Bharatiya Janata Party are now joining the NCP. Rural Development Minister Hasan Mushrif has accused the Bharatiya Janata Party (BJP) of starting with the entry of Rajiv Awale.
News English Title: Former MLA Rajiv Aawale from Kolhapur joined NCP in presence of Ajit Pawar News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा