मुंबई, १५ जुलै : कोरोना संसर्गामुळे निर्माण परिस्थिती लक्षात घेऊन पालिकेने जवळपास सर्वच धर्मांचा सणांवर निर्बंध घातले आहेत. अगदी गणेश विसर्जनासाठी देखील चौपाट्यांची गरज लागणार नाही अशीच स्थिती आहे. त्यासाठी दक्षिण मुंबईमध्ये पाच ठिकाणी अतिरिक्त कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रॅन्टरोड, ताडदेव, मलबार हिल, मुंबई सेंट्रल आणि गिरगाव येथे कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत.

दुसरीकडे कोरोना महामारीचे संकट यंदा गटारी साजरी करण्यावरही आले आहे. रविवार १९ जुलैला अमावास्येला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर मंगळवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. कोरोनामुळे मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात लॉकडाऊन वाढवल्यामुळे चिकन, मटणाची दुकाने, हॉटेल्स, ढाबेही बंद आहेत. त्यामुळे झणझणीत मटणाचा रस्सा, चिकन वडे, तंदुरी असा बेत आखणाऱ्या नागरिकांना गटारी निरुत्साहातच साजरी करावी लागणार आहे.

 

News English Summary: Considering the situation created due to corona infection, the municipality has imposed restrictions on festivals of almost all religions. Even for immersion of Ganesha, there is no need for Mumbai Chaupaty too.

News English Title: Corona Crisis increases nervousness in all festivals News Latest Updates.

कोरोना आपत्ती आणि लॉक-अनलॉकच्या गोंधळामुळे गटारीचा सुद्धा निरुत्साह