7 May 2025 10:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | एक-दोन नव्हे! तब्बल 43 टक्के परतावा मिळेल, फक्त 82 रुपयांचा शेअर खरेदी करा - NSE: NHPC IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC IREDA Share Price | मंदीत संधी, स्वस्त झालेला शेअर देईल 55 टक्के परतावा, अशी संधी सोडू नका - NSE: IREDA BEL Share Price | 23 टक्के अपसाईड कमाई करा, अशी संधी सोडू नका; टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
x

चिंताजनक! देशात गेल्या २४ तासांत ३४ हजार ८८४ नव्या रुग्णांची नोंद

India, Covid19, Corona Virus

नवी दिल्ली, १८ जुलै : देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ होत असून गेल्या २४ तासांत ३४ हजार ८८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आजच्या दिवसातील हा सर्वाधिक आकडा मानला जात आहे. नियमित मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असल्याने देशभरात आता चिंता व्यक्त केली जात आहे. या नव्या रुग्णसंख्येमुळे देशात सध्या १० लाख ३८ हजार ७१६ एकूण बाधितांचा आकडा पोहोचला आहे.

सध्या देशात ३ लाख ५८ हजार ६९२ रुग्णांवर उपचार असून ६ लाख ५३ हजार ७५१ रुग्णंनी कोरोनावर मात केली आहे. तर, २६ हजार २७३ रुग्णांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या दहा लाख ३८ हजार ७१६ वर पोहचली आहे. मागील २० दिवसांमध्ये तब्बल पाच लाख रुग्णांची वाढ झाली आहे. देशात २९ फेब्रुवारीला पहिला रुग्ण आढळल्यानंतर रुग्णसंख्या पाच लाखांवर जाण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागला. २६ जूनला पाच लाख असलेली बाधितांची संख्या शुक्रवारी १० लाखांच्या पुढे गेली. म्हणजेच देशात अवघ्या २० दिवसांत दुप्पट रुग्णवाढ झाली. देशात आतापर्यंत करोनामुळे २६ हजार २७३ जणांचा मृत्यू झाला आहे तर अद्याप तीन लाख ५८ हजार ६९२ जणांवर उपचार सुरू आहेत.

 

News English Summary: The number of corona patients is increasing day by day in the country and 34 thousand 884 new patients have been registered in the last 24 hours. This is considered to be the highest number today.

News English Title: Spike Of 34884 Cases And 671 Deaths Reported In India In The Last 24 Hours News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या