16 December 2024 12:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

PM Cares Fund एनडीआरएफ'मध्ये ट्रान्सफर करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

PM Care Fund, Supreme Court, Rejects Transfer Funds To NDRF

नवी दिल्ली, १८ ऑगस्ट : पीएम केअर फंडमध्ये ( PM Cares Fund ) जमा केलेले पैसे राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी ( NDRF) मध्ये हस्तांतरित केले जाऊ शकत नाहीत. या संदर्भात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. कोरोना साथीच्या साथीसाठी लढा देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने पीएम केअर फंड ट्रस्टची स्थापना केली गेली आहे.

सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनने (CPIL) १७ जून रोजी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या जनहित याचिकेचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. या याचिकेत पीएम केअर फंडात जमा केलेली रक्कम राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी एनडीआरएफ फंडाकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली होती.

या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणाऱ्या पीएम केअर फंडासंदर्भात दिलेल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे की, “पीएम केअर फंडातील निधी राष्ट्रीय आपत्ती मदत निधीमध्ये जमा अथवा हस्तांतरित करता येणार नाही,” असं सांगितलं.

 

News English Summary: The Supreme Court on Tuesday refused to direct the Centre to transfer the contributions made to the PM Cares Fund for battling the Covid-19 pandemic to the National Disaster Response Fund (NDRF). A bench headed by Justice Ashok Bhushan said that voluntary contribution can always be made to the NDRF as there is no statutory bar under the Disaster Management Act.

News English Title: PM Care Fund Supreme Court Rejects Demand To Transfer Funds To NDRF News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x