10 May 2025 12:43 PM
अँप डाउनलोड

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची मारेकरी नलिनीचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न

Former Prime Minister Rajiv Gandhi, Killer Nalini, Attempts Suicide In Prison

वेल्लोर, २१ जुलै : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील प्रमुख मारेकरी नलिनी मुरुगण हिने काल संध्याकाळी वेल्लोर तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न केला. वेल्लोर तुरुंगातील एका महिला कैद्याशी भांडण झाल्यावर नलिनी हिने आपल्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांनी चपळतेने हा आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला. नलिनी हिच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे वेल्लोर तुरुंगातच नव्हे, तर तामिळनाडूमध्येही खळबळ माजली आहे.

नलिनी ही गेली 28 वर्ष वेल्लोर तुरुंगात शिक्षा भोगत आहे. राजीव गांधी हत्याकांडातील इतर 6 आरोपीही याच तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यामध्ये नलिनी हिचा पती श्रीहरन उर्फ मुरुगण याचाही समावेश आहे. याच तुरुंगात नलिनी हिने आपल्या मुलीला जन्म दिला होता. आज ही मुलगी मोठी झाली आहे. नलिनी ही वेल्लोर तुरुंगात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत आहे.

दरम्यान राजीव गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी दोषी नलिनीसोबत कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या तिच्या पतीने फोन करुन नलिनीला दुसऱ्या कारागृहात हलवलं जावं अशी मागणी वकिलाकडे केली आहे. यासाठी लवकरच कायदेशीर विनंती करणार असल्याची माहिती वकिलाने दिली आहे.

२१ मे १९९१ रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकऱणी नलिनी आणि तिच्या पतीसहित एकूण सात जणांना विशेष टाडा कोर्टाने दोषी ठरवलं होतं. त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. नंतर फाशीची शिक्षा माफ करून जन्मठेपेत रुपांतर करण्यात आलं.

 

News English Summary: Nalini Murugan, the mastermind behind the assassination of former Indian Prime Minister Rajiv Gandhi, attempted suicide in Vellore jail last evening. Nalini tried to commit suicide by hanging herself with her sari after an argument with a female inmate at Vellore Jail.

News English Title: Former Prime Minister Rajiv Gandhi Killer Nalini Attempts Suicide In Prison News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या