3 May 2025 1:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

छत्रपतींच्या वंशजांना पुन्हा‌ मागच्या रांगेत ठेवून इतिहास पुनर्जीवित केला - सचिन राऊत

Congress leader Sachin Sawant, Chhatrpati Shivaji Maharja, MP Udayanraje Bhonsale

मुंबई, २३ जुलै : भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभा सदस्यत्त्वाच्या शपथविधीवेळी झालेला वाद ताजा असतानाच आता यामध्ये आणखी नवी भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आपल्या निवासस्थानी राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीत उदयनराजे यांना मागच्या रांगेत बसावे लागल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्विट करुन भाजपवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवरायांच्या वंशजांनी केलेल्या घोषणाही चालत नाही. छत्रपतींच्या वंशजांना पुन्हा‌ अतिशय मागच्या रांगेत ठेवून इतिहास पुनर्जीवित केला जातो.शिवरायांच्या आशीर्वादाचे नाव घेत सत्तेवर आलेली भाजपा औरंगजेबासारखे राज्य चालवत असल्याचे सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तत्पूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्याकडून सांगली-सातारा बंदची अदयाप घोषणा नाही, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही, याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? असा सवाल करत भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. याशिवाय, शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावरही संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. संभाजी भिडे यांच्याकडून सांगली, सातारा बंदीची अद्याप घोषणा नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

 

News English Summary: Congress leader Sachin Sawant has targeted the BJP by tweeting in this regard. The declarations made by the descendants of Shivaji in the name of Chhatrapati Shivaji Maharaj do not work. History is revived by placing Chhatrapati’s descendants in the back row.

News English Title: Congress leader Sachin Sawant take a dig on BJP over insult of Chhatrpati Shivaji Maharja ancestors MP Udayanraje Bhonsale News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#ChhatrapatiShivajiMaharaj(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या