2 May 2025 5:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC
x

राज्यात इयत्ता तिसरी ते १२ वीसाठी Jio TV वर एकूण १२ चॅनेल्स सुरु

Coronavirus, Education Minister, Youtube Channel, JIO TV

मुंबई, २४ जुलै : एकीकडे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या निकालाविषयी बोलताना या महिना अखेरीपर्यंत SSC चा निकाल लागेल, असं म्हटलं आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल लागायला विलंब झाला आहे. १६ जुलैला महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला.

बारावीप्रमाणेच दहावीचा निकालही ऑनलाईनच जाहीर होईल. बोर्डाच्या वेबसाईटवर mahresult.nic.in या वेबसाईटवर निकाल जाहीर होतील. निकालाची नेमकी तारीख शिक्षणमंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केली नसली तरी पुढच्या काही दिवसात दहावीच्या बोर्डाचा निकाल लागेल हे निश्चित.

दुसरीकडे, वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “इयत्ता पहिली ते दहावीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने चार युट्यूब चॅनेल सुरु केले आहेत. लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा सुरु होणार आहेत. इयत्ता तिसरी ते बारावीसाठी आता जिओ टीव्ही वर एकूण १२ चॅनेल सुरु करण्यात आले आहेत. महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे ज्याने चार माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरु केले आहेत”.

याआधी वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन वर्गांचं वेळापत्रक ट्विट करून जाहीर केलं होतं. करोनाचा जास्त प्रादुर्भाव असल्यानं राज्य सरकारनं १५ जून पासून शैक्षणिक वर्षाला सुरूवात केली. मात्र, स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर अशा भागात ऑनलाईन पद्धतीनं शिकवणी वर्ग घेण्याचं नियोजन शिक्षण विभागानं केलं आहे. आता बालवाडी ते बारावीपर्यंतच्या वर्गांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

 

News English Summary: The State Council for Educational Research and Training has launched four YouTube channels for Marathi and Urdu medium students of class I to X. Coming soon for Hindi and English mediums as well. A total of 12 channels have now been launched on Geo TV for Class III to XII.

News English Title: Coronavirus Maharashtra Education Minister Youtube Channel JIO TV For Students News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या