15 December 2024 1:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

मुंडे, शेलार, तावडेंना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळण्याची शक्यता..खडसे अधांतरी

Pankaja Munde, Ashish Shelar, Pankaja Munde

नवी दिल्ली, १८ जुलै : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सद्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. मात्र दिल्लीत गेल्यानंतर राज्यातील काही मंत्र्यांसाठी त्यांनी खुश खबर आणली आहे. कारण भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद ताडवे, संभाजी-निलंगेकर पाटील यांना स्थान मिळाल्याचं समोर येतंय. याबाबत अद्यापही अधिकृत माहिती मिळालीी नसू भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्यासोबत फडणवीस आज भेट घेणार आहेत.

देवेंद्र फडणवीस काल दिल्लीला गेले. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. राज्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच, वेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीत निवड होणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच, पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद ताडवे, संभाजी-निलंगेकर पाटील यांनाही राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान मिळणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे जे. पी. नड्डा यांनी २० जानेवारी रोजी स्वीकारली होती. नव्या अध्यक्षाबरोबरच नवी कार्यकारिणी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, करोना आणि लॉकडाऊन यामुळे ही कार्यकारिणी लांबली होती. मात्र, येत्या ८ ते १० दिवसात ही नवी कार्याकारिणी अस्तित्वात येण्यार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

भारतीय जनात पक्षाने काही दिवसांपूर्वी राज्यात नवीन कार्यकारणी जाहीर केली होती. त्या कार्यकारणीत प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करणा-यांना महत्त्वाचे स्थान नसेल हे पक्षाने स्पष्ट केलं. या यादीवर पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव असल्याचंही यादीवर नजर टाकल्यावर स्पष्ट झालं होतं.

एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता या नेत्यांना कार्यकारणीत फक्त विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आलं. पण हे स्थान म्हणजे राज्यातलं केंद्रासारखं हे राज्यातले मार्गदर्शक मंडळ असल्याची चर्चा सुरु झाली होती. तर पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना केंद्रात संधी मिळणार असं तेव्हाच सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांची राष्ट्रीय कार्यकारणीत निवड होत असल्याची माहिती आहे.

 

News English Summary: Former Chief Minister and Leader of Opposition Devendra Fadnavis is currently on a tour of Delhi. But after moving to Delhi, he has brought good news for some ministers in the state. Because Pankaja Munde, Ashish Shelar, Vinod Tadve, Sambhaji-Nilangekar Patil have got a place in the national executive of BJP.

News English Title: Big opportunity from Delhi for BJP Pankaja Munde after Devendra Fadnavis visit News latest Updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x