6 May 2024 6:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

शरद पवार दिल्लीकडे रवाना | भाजप विरोधातील आघाडीच्या राजकारणाला वेग येण्याची शक्यता

NCP President Sharad Pawar

मुंबई, २१ जून | राष्ट्रवादी काँग्रेसचेसर्वेसेवा शरद पवार अखेर मोठ्या ब्रेकनंतर राजधानी दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेनंतर गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेणारे शरद पवार रविवारी दिल्लीसाठी रवाना झाले असून २३ जूनपर्यंत राजधानीमध्येच असणार असं वृत्त आहे. त्यामुळे दिल्लीत भारतीय जनता पक्षविरोधी रणनीतीला जोर येणार असल्याचं म्हटलं जातंय.

शरद पवार यावेळी देशातील राजकीय स्थितीवर तसंच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाविरोधात विरोधकांना एकत्र आणत रणनीती आखण्यासंबंधी विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता आहे. फ्री प्रेस जर्नलने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

राष्ट्रवादी पक्षाने शरद पवार २३ जूनपर्यंत दिल्लीत असतील याला दुजोरा दिला आहे, परंतु त्यांनी इतर कोणतीही माहिती देण्यास नकार दिल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे यानंतर शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात भेट झाली होती. प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची भेट घेऊन तब्बल ३ तास चर्चा केली होती. त्यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार महत्वाची भूमिका बजावताना भारतीय जनता पक्षविरोधात मोठी आघाडी उघडण्याची शक्यता यापूर्वीच राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: NCP President Sharad Pawar Delhi Opposition Parties Lok Sabha Election 2024 news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x