6 May 2024 3:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली
x

मंदिर पाडून तिथे पुन्हा मशीद बांधली जाईल; मुस्लिम नेत्याची दर्पोक्ती

Ram Mandir, Ayodhya, Demolished To Build Mosque, Muslim Leader Provokes

नवी दिल्ली, ६ ऑगस्ट: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (५ ऑगस्ट) अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. अयोध्येतील राम मंदिर हे अंदाजे तीन वर्षांत बांधून पूर्ण होईल असे मंदिराचे संरचनाकार सांगत आहेत. पण त्याचदरम्यान, ऑल इंडिया इमाम असोसिएशनच्या अध्यक्षांनी एक चिथावणीखोर वक्तव्य केले आहे.

साजिद रशिदी म्हणाले की, इस्लाम सांगतो की, मशीद नेहमी मशिदच राहते. अन्य काही बांधकाम केल्याने मशीदीचे अस्तित्व संपत नाही. बाबरी मशीद तिथे होती आणि नेहमीच मशिदीच्या रूपात तिथे राहील. मंदिर तोडून मशीद बांधण्यात आलेली नाही. मात्र आता असे होऊ शकेल. मंदिर पाडून तिथे पुन्हा मशीद बांधली जाईल.

दरम्यान, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानेही राम मंदिरावरून काल वादग्रस्त विधान केले होते. बाबरी मशीद काल होती, आज आहे आणि उद्याही राहील, मशिदीत मूर्ती ठेवल्याने किंवा नंतर पूजा सुरू केल्याने तसेच बराच काळ नमाज पठणास बंदी घातल्याने मशिदीचा दर्जा संपुष्टात येत नाही, बाबरी मशीद ही हिंदूंच्या कुठल्याही प्रार्थनास्थळाला तोडून बांधण्यात आली नव्हती. असे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आपल्या पत्रकात म्हटले होते. तसेच मंदिर तोडून मशीद बांधण्याबाबत इशारा दिला होता.

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा काल पार पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशाचं लक्ष या सोहळ्याकडे लागलं होतं. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. सरसंघचालक मोहन भागवत कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही सोहळ्यासाठा उपस्थित होते.

 

News English Summary: Sajid Rashidi said that Islam says that a mosque always remains a mosque. Some other construction does not end the existence of the mosque. The Babri Masjid was there and will always be there as a mosque. The temple was not demolished and the mosque was not built. But now it can happen. The temple will be demolished and a mosque will be built there.

News English Title: Ram Mandir In Ayodhya Will Be Demolished To Build Mosque Says Muslim Leader Provokes A Day After Lord Ram Temple Foundation Laid By Pm Modi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RamMandir(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x