6 May 2025 9:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | एक-दोन नव्हे! तब्बल 43 टक्के परतावा मिळेल, फक्त 82 रुपयांचा शेअर खरेदी करा - NSE: NHPC IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC IREDA Share Price | मंदीत संधी, स्वस्त झालेला शेअर देईल 55 टक्के परतावा, अशी संधी सोडू नका - NSE: IREDA BEL Share Price | 23 टक्के अपसाईड कमाई करा, अशी संधी सोडू नका; टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
x

डिसेंबरपर्यंत भारतात उपलब्ध होईल कोरोनाची लस - अदर पूनावाला

Siram Institute Adar Poonawala, Corona virus, Covid19 Vaccine

मुंबई, ११ ऑगस्ट :  कोरोना विषाणूवरील लशीच्या तिसºया टप्प्यातील चाचणीपर्यंत अनेक जागतिक कंपन्या पोहोचल्या असल्यामुळे ही लस मिळवण्यासाठी भारत युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. रशियन विद्यापीठाने पुढील आठवड्यात सुरवातीला या लशीची नोंदणी करण्याचे संकेत दिले असून व्यापक प्रमाणावर त्याचे उत्पादनही सुरू केले.

कोविड-१९ वरील लस प्राप्त करणे व तिच्याशी संबंधित व्यवस्थापनाच्या पंतप्रधान मोदी यांच्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांची या लशीवर बारीक नजर आहे. ही लस ऑक्सफोर्ड, कॅनसिनो आणि फिझर यासारख्या जागतिक कंपन्यांकडून चाचणी घेतली जात आहे. या कंपन्या तिसºया टप्प्यातील चाचणीपर्यंत गेल्या आहेत. भारतीय लशीच्या चाचण्या या प्रारंभिक टप्प्यावर असल्यामुळे हा टास्क फोर्स जागतिक कंपन्यांकडून या लशी प्राप्त करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधत आहे.

दुसरीकडे भारतातीही शास्त्रज्ञ दिवसरात्र एक करून लस विकसित करत आहे. दरम्यान, भारतातील करोना लसीची चाचणी सुरू असून यादरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. या वर्षाच्या अखेरिस भारतला आपली करोनाची लस मिळणार असल्याचा दावा सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी केला आहे.

डिसेंबर महिन्याच्या सुरूवातील आपली कंपनी करोनावरील लस लाँच करणार असल्याचं अदर पूनावाला म्हणाले. सीएनबीसी टीव्ही १८ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. “पुढील दोन आठवड्यांमध्ये करोनाच्या लसीची चाचणी सुरू करण्यात येणार आहे. ही चाचणी आयसीएमआरसोबत करण्यात येईल. ऑगस्ट महिन्याच्या अखेरिस आम्ही लसीचं उत्पादन सुरू करणार आहोत,” असंही पूनावाला म्हणाले.

 

News English Summary: Scientists in India are also developing vaccines day and night. Meanwhile, testing of the corona vaccine in India is underway, and there is some comforting information. Adar Poonawala, chief executive officer of the Serum Institute, has claimed that India will get its corona vaccine by the end of this year.

News English Title: Siram Institute Adar Poonawala Says Corona virus Vaccine Will Be In Market Till December Declared Price Before News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या