4 October 2023 9:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Vs Jupiter Wagons Share | बापरे! ज्युपिटर वॅगन्स शेअरने 3 वर्षात 4300 टक्के परतावा दिला, अक्षरशः पैशाचा पाऊस पडतोय हा शेअर Multibagger Stocks | सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स शेअरने अल्पावधीत 124% परतावा दिला, मजबूत कमाई करण्याची संधी Quick Money Shares | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अवघ्या एका महिन्यात 150 टक्के पर्यंत परतावा देत आहेत, फायदा घेणार? Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 04 ऑक्टोबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत मोठे अपडेट, इंडेक्स नंबर घसरल्याने आता DA किती वाढणार? Stocks in Focus | एका आठवड्यात 53 टक्के पर्यंत परतावा देणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट पैसे गुणाकारात वाढवतील BOI Net Banking | सरकारी बँक ऑफ इंडियाच्या FD योजनेवरील व्याजदरात वाढ, गुंतवणूकदारांना मिळणार इतकं अधिक व्याज
x

महावितरणला मनसे झटका | मनसे कार्यकर्त्यांनी महावितरणचे कार्यालय फोडले

Vandalism by MNS, Navi Mumbai MSEDCL office, Raj Thackeray, Amit Thackeray

नवी मुंबई, ११ ऑगस्ट : महावितरणच्या वाढीव वीज बिलाचा फटका सर्वसामान्यांसह दिग्गज लोकांना देखील बसला आहे. अगदी भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही फटका बसला होता. मुक्ताईनगर येथील त्यांच्या राहत्या घराचे बिल एक लाखाहून अधिक रकमेचे आल्याने त्यांनी आपला संताप व्यक्त केला होता. महावितरणने सर्व सामान्य जनतेला वेठीस धरू नये, बिलांमध्ये सूट द्यावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली होती.

तत्पूर्वी वीज बिलामध्ये काहीतरी सवलती द्या. नागरिकांना वेठीस धरु नका, अशी निवेदनं मनसेने सुद्धा महावितरण आणि खाजगी वीज वितरक कंपन्यांना दिली होती. लॉकडाउनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहे. वीज बिल कमी करावे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबद्दल राज्य सरकारला पत्र लिहिले होते. त्यानंतर आता मनसे कार्यकर्त्यांनी आपल्या स्टाईलने आंदोलन सुरू केले आहे.

नवी मुंबई आज सकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. वाशी सेक्टर १७ मधील महावितरणच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. कार्यालयाच्या काचा आणि फर्निचरची कार्यकर्त्यांनी तोडफोड करून वीज बिल दरवाढीचा निषेध केला आहे.

 

News English Summary: Navi Mumbai MNS workers have started agitation this morning. MNS workers have vandalized the MSEDCL office in Vashi Sector 17. Activists have vandalized office glass and furniture to protest the increase in electricity bills.

News English Title: Vandalism by MNS workers Navi Mumbai MSEDCL office video News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x