27 April 2024 12:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

अहो नोकर्‍याच नाहीत, तर आरक्षणाचे करणार काय ? नितीन गडकरी

औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आरक्षणावर त्यांची रोखठोक भूमिका व्यक्त केली आहे. औरंगाबादमध्ये येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली असता, त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रतिक्रिया मत व्यक्त केलं आहे.

मराठा आरक्षणावर बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्यावरुन राजकारण करणे योग्य नाही. नोकर्‍याच नाहीत, तर आरक्षणाचे करणार काय ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात आगीत तेल ओतण्याचे काम जबाबदार पक्षाने करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत. सर्वांनी मिळून तोडगा काढणे गरजेचे असल्याचेही गडकरी म्हणाले.

तसेच पुढे गडकरी म्हणाले की जात, पंथ आणि भाषा यांच्या आधावरील राजकारण कमी केले पाहिजे. बस जाळणे, हिंसाचार करणे योग्य नाही. सरकार दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करेल आणि तयार केलेले रस्ते अनेक वर्ष चांगले राहतील याची खबरदारी घेतली जाणार आहे. कंत्राटदाराने कसूर केल्यास कारवाई केली जाईल. मुंबई आणि नवी मुंबईचे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. मात्र, मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे पहा एकही खड्डा नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. जलमार्ग व नदी जोड प्रकल्पाला आमचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x