29 April 2024 8:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

सामान आणि प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध काढण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु : गृहमंत्री

Restrictions Withdrawn, Home Minister Anil Deshmukh

मुंबई, २३ ऑगस्ट : देशभरात पसरलेल्या करोनानं सगळं जनजीवन ठप्प झालं आहे. करोनाचा संसर्ग रोखण्याचं आव्हान निर्माण झाल्यानं केंद्र सरकारबरोबरच राज्यानीही लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. त्यामुळे माल वाहतूक वगळता इतर सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली आहे. याचे परिणाम आर्थिक स्वरूपात दिसून आल्यानंतर केंद्र सरकारनं राज्यांना राज्यातंर्गत आणि राज्याराज्यातील वाहतुकीवरील निर्बंध हटवण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे राज्यातील वाहतूक विना निर्बंध सुरू होण्याची शक्यता आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तसे संकेत दिले आहेत.

केंद्र सरकारने वाहतुकीवरील निर्बंध कमी केले आहेत. मात्र, प्रत्येक राज्यात त्या त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीनुसार नियमांमध्ये बदल होत आहेत. काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्बंधांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचंही समोर आलं. त्यामुळेच केंद्र सरकारने नव्याने हे निर्देश जारी केले आहेत.

यानुसार देशभरात विविध राज्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये वाहतुकीवर अनेक निर्बंध लावण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यांमध्ये होणाऱ्या वस्तूंच्या आणि सेवेच्या वाहतुकीच्या दळणवळणावर परिणाम होत आहे. यामुळे अनेक वस्तूंच्या पुरवठ्यावर वाईट परिणाम होत आहे.

 

News English Summary: It had directed the removal of restrictions on traffic in the state. Therefore, traffic in the state is likely to start without restrictions. State Home Minister Anil Deshmukh has indicated so.

News English Title: Restrictions Will Be Withdrawn Soon In Maharashtra Home Minister Indicates News Latest updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x