15 May 2024 5:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

राज्यातील मंदिरं उघडा | शिवसेनेची सामनातून मागणी

Shiv Sena demands, Saamana Newspaper

मुंबई, २४ ऑगस्ट : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व मंदिरं दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून लॉकडाऊन पाळण्यात येत असल्याने अनेक उद्योगधंद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातचं देशातील मंदिरांवर असंख्य लोकांची उपजीविका अवलंबून आहे. मंदिरांचंही एक अर्थकारण असतं. कोट्यवधी लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न मंदिरं आणि इतर प्रार्थनास्थळं सोडवत असतात. त्यामुळे मंदिरं सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.

देशाची आर्थिक घडी साफ विस्कटली आहे. त्यामुळे राज्य चालवण्यासाठी आर्थिक बाबींचा विचार करावाच लागेल व त्यात काय चुकलं? आम्ही स्वतः मंदिरे, व्यायामशाळा खुल्या कराव्यात या मताचे आहोत. मंदिरे ही जनतेची श्रद्धास्थळंच आहेत व मंदिरातील देव हे दुर्बलांना आधार देत असतात. प्रत्येकाच्या मानण्यावर ते आहे. अनेकांचा चरितार्थ मंदिराशी संबंधित आहे. तेव्हा मंदिराचा विषयही आर्थिक उलाढालीचाच आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यामध्ये आर्थिक व्यवहाराचा समावेश असलेल्या प्रत्येक गोष्टीस परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच पैशांचा संबंध असेल तर धोका पत्करण्याची राज्याची तयारी आहे. मात्र मंदिरे, मशिदी उघडण्याचा धार्मिक प्रश्न येतो. तेव्हा मात्र नेमकी ‘कोरोना’ची आठवण येते. हे अतिशय विचित्र आहे. न्यायालयाचा प्रत्येक निर्णय हा ”यस, माय लॉर्ड…”, ”होय महाराजा” म्हणूनच मान झुकवून स्वीकारायचा असतो. त्यात हा निर्णय धार्मिक स्वरूपाचा असल्याने त्याचा आदर करावाच लागेल. मात्र, मंदिरात सध्या गर्दी नको हा निर्णय घेण्याची वेळ राज्यांवर का आली याचाही विचार व्हायला हवा, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

 

News English Summary: The livelihood of many people depends on temples in the country. Temples also have a meaning. Temples and other places of worship solve the livelihood problems of billions of people. Therefore, Shiv Sena has demanded that temples should be started in the front page of the match.

News English Title: Open temples that support the livelihoods of billions of people Shiv Sena demands News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x