2 May 2024 6:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

येत्या 7 आणि 8 सप्टेंबरला राज्य विधिमंडळाचं अधिवेशन मुंबईत

Monsoon convention, Antigen test, MLAs

मुंबई, २५ ऑगस्ट : महाराष्ट्रात विधिमंडळ अधिवेशन कधी होणार याचा निर्णय शेवटी झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांना एकत्र बोलवून सत्र घ्यायचं की नाही, यावर चर्चा सुरू होती. पण शेवटी आता फक्त दोन दिवसांचं विधिमंडळाचं अधिवेशन घ्यायचा निर्णय झाला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान अद्याप कमी झालेलं नाही. अनेक नेते, आमदार, मंत्री यांनाही या विषाणूची लागण झालेली आहे. अनेक जण यातून बरेही झाले आहेत. पण अशा वेळी राज्यभरात एकत्र संमेलनं, बैठका यावर बंदी असताना विधिमंडळाचं अधिवेशन घ्यायचं का हे ठरलं नव्हतं. पण अत्यावश्यक विधेयकं आणि पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचं अधिवेशन बोलावण्याचा निर्णय झाला आहे. येत्या 7 आणि 8 सप्टेंबरला राज्य विधिमंडळाचं अधिवेशन मुंबईत होईल, विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला.

दोन दिवसीय अधिवेशनासाठी दोन्ही सभागृहातील आमदारांची अँटिजन चाचणी करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सदस्यांना कोरोनापासून सुरक्षितता म्हणून सुरक्षा किट दिले जाईल. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येणाऱ्या आमदारांना सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे सदस्यांच्या पीएना आतमध्ये प्रवेश मिळणार नाही मात्र त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. वाहनचालकांना देखील बसण्याची तसेच त्यांच्या नाश्ता, चहापाणी स्वतंत्र व्यवस्था सरकारकडून करण्यात येणार आहे.

प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीत देखील शारीरिक अंतराचे नियम पाळून मा सदस्यांची आसन व्यवस्था केली जाणार आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येणाऱ्या आमदारांना सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच इतरही आजार असलेल्या सदस्यांना त्यांच्या त्यांच्या पक्ष गट नेत्यांकडून काळजी घेण्याची सूचना देण्यात येतील.

 

News English Summary: It was finally decided when the Legislative Assembly would be held in Maharashtra. Against the backdrop of Corona, there was a discussion on whether to call the MLAs together and hold a session. But in the end, it has been decided to hold a two-day session of the legislature.

News English Title: A two day monsoon convention to be held on September 7 and 8 MLAs will be tested for antigen News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x