5 May 2024 1:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी
x

मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही, फडणवीस संतापले | वाद पेटणार

BJP leader Devendra Fadnavis, Eknath Khadse, Allegations, Marathi News ABP Maza

मुंबई, ११ सप्टेंबर : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत. आरोप करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा ड्राय क्लिनर असा उल्लेखही केला होता. त्यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं असून माझ्यामध्ये खूप संयम असून, मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही असं म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मनीष भंगाळे प्रकरणी खडसेंना राजीनामा द्यावा लागला नासून १२ तासांत खडसेंना क्लीन चीट मिळाली. खडसेंना एमआयडीसी प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. खडसेंबद्दल भाजपच्या पक्षश्रेष्ठींना सर्व माहित असल्याचं वक्तव्य फडणवीसांनी केलं. सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये आहेत. दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. एकनाथ खडसे, मराठा आरक्षण, त्याचबरोबर अभिनेत्री कंगना राणौतविषयी देखील त्यांनी भाष्य केलं.

काय म्हणाले एकनाथ खडसे
मला उध्वस्त करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्यामुळे त्रास झाला. मला जो त्रास झाला तो फक्त फडणवीस यांच्यामुळे म्हणून त्यांचे नाव घेतो, असे जाहीर वक्तव्य खडसे यांनी केले. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे.

 

News English Summary: Devendra Fadnavis has replied to Eknath Khadse that I have a lot of patience and I have never washed the house on the street. He made the remarks while talking to the media. In the Manish Bhangale case, Khadse had to resign and within 12 hours, Khadse got a clean chit. Khadse had to resign in the MIDC case.

News English Title: BJP leader Devendra Fadnavis On Eknath Khadse Allegations Marathi News LIVE latest updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x