29 April 2024 5:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका
x

चंद्रकांतदादा आता काय करणार ? भुजबळांची कोठडी रिकामी झाली

मुंबई : भाजप नेत्यांविरुद्ध कोणी सुद्धा तोंड उघडलं की लगेच भाजपचे नेते भुजबळांच उदाहरण देऊन पुढे करायचे आणि अप्रत्यक्ष पणे आम्ही तुमचं सुद्धा तेच करू जे भुजबळांच झालं असा सूचक इशारा देणं काही नवीन राहील नव्हतं.

काही दिवसांपूर्वी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशारा दिला होता की, छगन भुजबळ यांच्या कोठडी शेजारी आणखी खोल्या रिकाम्या आहेत. परंतु ज्यांचं नाव घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांना दम देणं सुरु होत ते छगन भुजबळच बाहेर आल्याने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यापुढे राष्ट्रवादीच्या नेत्यांना काय दम देणार, याची उत्सुकता आहे.

आघडीच्या काळात अनेक घोटाळ्यांची प्रकरण गाजली होती आणि राष्ट्रवादीचे अनेक मंत्री आमदारांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते. उदाहरणार्थ अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्यात आमदार रमेश कदम आणि मनी लॉन्ड्रिग प्रकरणात भुजबळ हे तुरुंगात होते. मुख्य म्हणजे अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर सुद्धा सिंचन घोटाळ्याचे आरोप होते. त्यामध्ये सुनील तटकरे यांची सिंचन घोटाळ्या प्रकरणी प्राथमिक चौकशी सुद्धा झाली होती.

एनसीपीच्या नेत्यांना उद्देशून महसूल मंत्री म्हणाले होते की, छगन भुजबळांच्या कोठडी शेजारी आणखी काही कोठड्या शिल्लक आहेत असा अप्रत्यक्ष दम भरला होता. नुकतेच राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्त झालेले जयंत पाटील यांनी आयतीच संधी साधून आता चंद्रकांत पाटील हे काय बोलणार, असा सवाल त्यांनी केला. इतकंच नाही तर भुजबळांवर झालेली कारवाई ही सूडबुद्दीने प्रेरित असल्याचा आरोप सुद्धा जयंत पाटील यांनी केला आहे. पुढे भुजबळांबद्दल आशावाद व्यक्त करताना जयंत पाटील म्हणाले की, प्रकृतीने साथ दिली तर भुजबळ नक्कीच पक्षासाठी मैदान गाजवतील.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x