3 May 2024 1:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड BHEL Share Price | PSU शेअर सुसाट तेजीत, 1 वर्षात 258% परतावा दिला, अजून एक सकारात्मक अपडेट Tata Motors Share Price | 1 वर्षात 109% परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअर्समध्ये घसरण, पुढे नुकसान की फायदा?
x

JEE Advanced 2020 | परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी या सूचना लक्षात घ्या

JEE Exam advanced 2020, Joint Entrance Examination Advanced 2020, NEET Exam, MH CET Exam

मुंबई, 26 सप्टेंबर : JEE Advanced 2020: देशभरातील आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली JEE Advanced परीक्षा रविवारी २७ सप्टेंबर रोजी देशभरात होत आहे. सकाळी ९ ते १२ आणि दुपारी २.३० ते ५.३० अशा दोन सत्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे. जे विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत, त्यांना कोविड-१९ प्रादुर्भावाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काही सूचनांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे.

JEE Advanced Exam देण्यासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ९८ टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा केंद्र मिळाले आहे, असा आयआयटी दिल्लीचा दावा आहे. मास्क वापरणे, स्वत:चे हँडसॅनिटायझर सोबत पारदर्शक बाटलीत बाळगणे आणि त्याचा वापर करणे गरजेचे आहे. या गोष्टींशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

विद्यार्थ्यांना JEE Advanced परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी आयआयटी अलुम्नायने एक पोर्टलही लाँच केले आहे. Eduride असे या पोर्टलचे नाव आहे, अशी माहितीही आयआयटी दिल्लीने दिली आहे.

आरोग्यविषयक खबरदारी म्हणून कोणकोणत्या सूचनांचे विद्यार्थ्यांनी पालन करायचे आहे त्या पुढीलप्रमाणे :-

  • विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वत:चे फेसमास्क वापरावेत आणि पारदर्शक बाटलीत सॅनिटायझर बाळगावे. पाण्याची बाटलीही पारदर्शक हवी.
  • दोन जणांमध्ये कायम किमान सहा फुटांचे अंतर हवे. यासाठी परीक्षा केंद्रांवर रांग लावण्यासाठी विशिष्ट व्यवस्था करण्यात येईल. तेथील कर्मचारी सांगतील त्या सूचनांचे विद्यार्थ्यांनी पालन करावे.
  • परीक्षा केंद्रात शिरताना विद्यार्थ्यांच्या Admin Card वरील बार कोड स्कॅन होईल. त्यानंतर त्यांनी परीक्षा हॉलचा क्रमांक दिला जाईल.
  • विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी हात सॅनिटाइज करणे गरजेचे आहे.
  • परीक्षेसाठी जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडे कोविड-१९ सेल्फ डिक्लेरेशन असणे गरजेचे आहे, अन्यथा परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

देशभरातील एकूण २२२ शहरांमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. एकूण एक हजार परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. अधिकृत माहितीनुसार एकूण १ लाख ६० हजार ८३१ विद्यार्थ्यांनी यंदा JEE Advanced परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

 

News English Summary: JEE Advanced 2020: Indian Institute of Technology, Delhi has released the necessary standard operating procedure (SOP) for the upcoming Joint Entrance Examination (JEE) Advanced 2020. The exam is going to be held on 27 September. IIT Delhi is responsible for conducting the countrywide entrance exam. The institute has confirmed that no candidate will be denied entry to the examination centres if they follow all the specified COVID-19 guidelines.

News English Title: JEE Exam advanced 2020 instruction students must follow before entering exam centre Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#JEE Exam 2020(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x