4 May 2024 2:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

शिवसेनेसोबत सरकार बनवण्याचे कारणच नाही | मुलाखतीपूर्वी फडणवीसांच्या राऊतांना अटी

Devendra Fadnavis, Sanjay Raut, Meeting, Political Alliance

मुंबई, २७ सप्टेंबर : शनिवारची संध्याकाळ महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळासाठी खळबळ उडवून देणारी ठरली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते व मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यात अचानक झालेल्या भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या. दोन्ही नेत्यांच्या भेटीनं वेगवेगळ्या चर्चांचे पेव फुटले आहेत. संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या भेटीवर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. या भेटीत त्यांनी संजय राऊत यांना घातलेल्या अटींचाही उल्लेख केला आहे.

ANI या वृत्तसंस्थेशी बोलत असताना फडणवीस यांनी राऊत यांच्या भेटीबद्दल आणि महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराबद्दल स्पष्ट भाष्य केले आहे. ‘संजय राऊत यांनी माझी मुलाखत घेणार हे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांचा फोन आला होता. त्यामुळे मी काही अटी टाकल्या होत्या. त्यामुळे चर्चा करण्यासाठी राऊत यांची भेट झाली. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही आणि कारणही नाही’, असं स्पष्ट खुलासा फडणवीस यांनी केला आहे.

‘शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा सुरू नाही, त्यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याची कोणतीही चर्चा केली नाही. त्यासाठी असे कोणतेही कारण नाही, जे सरकारचे काम सुरू आहे. त्यावर जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे. त्यामुळे हे सरकार आपल्या कृतीमुळे कोसळेल, ज्यावेळी हे सरकार पडेल त्यावेळी आम्ही बघू पण सरकार बनवण्याची कोणतीही घाई भाजपला नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

 

News English Summary: Sanjay Raut ji wanted to take my interview for Shiv Sena’s newspaper Saamana. The meeting was held to discuss the same as I had put certain conditions, I wanted it to be published unedited. No political talks held in meeting said Former Maharashtra CM & BJP leader Devendra Fadnavis.

News English Title: Devendra Fadnavis Sanjay Raut Meeting Mumbai Shivsena Bjp Political Alliance Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x