29 April 2024 11:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

CBI, ED, Income Tax, Police यांना मोदी-शहांनी बाहुले बनवले आहे - आ. अबू आझमी

Samajwadi Party , MLA Abu Azmi, PM Narendra Modi, Amit Shah

मुंबई, ३० सप्टेंबर : तब्बल २८ वर्षानंतर बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात विशेष न्यायालयात आज निर्णय सुनावला. यावेळी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं सर्व म्हणजेच ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल दिलाय. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर फैजाबादमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. यातील एक एफआयआर लाखो कारसेवकांविरोधात दाखल करण्यात आली होती तर दुसरी एफआयआर संघाच्या कार्यकर्त्यांसहीत लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, तत्कालीन शिवसेना नेते बाळ ठाकरे यांच्याविरोधात दाखल करण्यात आली होती.

दरम्यान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. देशाच्या लोकशाहीसाठी आजचा काळा दिवस आहे, १९९२ बाबरी मस्जिद जबरदस्तीनं पाडण्यात आली, संपूर्ण जगाने ते पाहिलं, हा खटला अनेक वर्षापासून सुरु आहे. आमचा कायद्यावर विश्वास आहे, पण जेव्हा पासून दिल्लीत मोदी सरकार आलं आहे. तेव्हापासून सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, पोलीस यांना मोदी आणि अमित शहांनी बाहुले बनवले आहे, बाबरीचा निकाल आला तेव्हा न्यायाधीशांनी सांगितले बाबरी मस्जिद पडली ते चुकीचं झालं, पण इतकी मोठी मस्जिद पाडली त्यात पुरावे मिळाले नाहीत, आता या देशात हेच होणार आहे असा आरोप आमदार अबू आझमींनी केला.

 

News English Summary: Samajwadi Party MLA Abu Azmi has reacted sharply. Today is a black day for the democracy of the country. The Babri Masjid was forcibly demolished in 1992. The whole world saw it. This lawsuit has been going on for many years. We believe in the law, but since the Modi government came to power in Delhi. Since then, the CBI, ED, Income Tax, Police have been manipulated by Modi and Amit Shah.

News English Title: Samajwadi Party MLA Abu Azmi criticized PM Narendra Modi and Amit Shah over CBI ED and Income Tax department Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x