17 May 2024 3:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला मारहाण केली | मोबाईल हिसकावून घेतले | पीडितेच्या कुटुंबीयांचा आरोप

Hathras Victims Family, Uttar Pradesh, Gangrape, Yogi Sarkar

लखनऊ, ३ ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणाची देशभरामध्ये चर्चा आहे. या प्रकरणामधील पीडित तरुणीचा मंगळवारी उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. पीडित तरुणी १४ सप्टेंबरपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर मंगळवारी तिची प्राणज्योत मालवली. चौघांनी तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, तरुणीच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशमधील वातावरण चांगलेच तापले असून आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणात राज्य सरकारने SITचं गठण केलं असून ते तपास करत आहेत. मात्र या किंवा CBI चौकशीवर आमचा विश्वास नाही असंही कुटुंबीयांनी म्हटलं आहे. या प्रकरणात पोलिसांवरही कडक कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.

पीडितेच्या कुटुंबाने हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीण लक्षकार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. प्रवीण लक्षकार यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडून मोबाईल फोन हिसकावून घेतले. पीडितेचा भाऊ पोलिसांचा पहारा चुकवून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीपर्यंत पोहोचला. शेतातून लपत-छपत हा मुलगा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना येऊन भेटला. त्यावेळी त्याने सांगितले की, ‘पोलिसांनी आमच्याकडून मोबाइल फोन हिसकावून घेतले. घरातून कुणालाही बाहेर येण्यास मनाई केली आहे.

आमचे कुटुंबीय माध्यमांशी बोलू इच्छत आहे. पण, घरातून आम्हाला बाहेर येता येत नाही. पोलिसांनी घराबाहेर कडक बंदोबस्त ठेवला आहे. घरासमोर, रस्ते, शेतात पोलीस तैनात करण्यात आले आहे. याला विरोध केला असता डीएम प्रवीण लक्षकार यांनी पीडितेच्या वडिलांच्या लाथ मारली होती. त्यामुळे ते बेशुद्ध पडले होते. त्यानंतर सर्वांना घरात बंद करण्यात आले.

 

News English Summary: The gang-rape case in Hathras in Uttar Pradesh is being discussed across the country. The young woman in the case died Tuesday during treatment. The victim is undergoing treatment at a hospital in Safdarjung, Delhi. The victim had been battling for her life since September 14. She finally lost her life on Tuesday. The four are accused of raping the girl.

News English Title: Hathras case she is not our daughter who was cremated by police that night says family Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x